Press "Enter" to skip to content

उरण काँग्रेसच्या शहर अध्यक्षपदी प्रकाश पाटील

सिटी बेल | उरण | घन:श्याम कडू |

उरण काँग्रेसच्या शहर अध्यक्षपदी प्रकाश पाटील यांची निवड करण्यात आली आहे. प्रकाश पाटील यांची शहर अध्यक्षपदी निवड होताच त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

किरीट पाटील यांनी शहर अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. त्यामुळे रिक्त असलेल्या शहर अध्यक्षपदी प्रकाश पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली. आता काही दिवसांवर नगरपालिका निवडणुकीचे वारे वाहणार आहेत. त्या निवडणुकीत शहरात काँग्रेसची ताकद दाखविण्याचे आव्हान नवनिर्वाचित शहर अध्यक्ष प्रकाश पाटील यांच्यासमोर असणार आहे.

शहर अध्यक्षपदी प्रकाश पाटील यांची निवड होताच त्यांनी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष महेंद्र घरत यांची भेट घेतली. यावेळी जिल्हाध्यक्ष महेंद्र घरत यांनी नवनिर्वाचित शहर अध्यक्ष प्रकाश पाटील यांचा सत्कार करून त्यांना पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या. यावेळी काँग्रेसचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते.

शहर अध्यक्षांची निवड झाली मग आता तालुका अध्यक्षांची निवड कधी होईल अशी चर्चा उरण काँग्रेस कार्यकर्त्यांत सुरू होती.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.