Press "Enter" to skip to content

आदिवासी, कातकरी बांधवांना लाभ मिळण्यासाठी प्रयत्न

रायगड जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष महेंद्रशेठ घरत यांनी घेतली आदिवासी प्रकल्प अधिकारी शशिकला अहिरराव यांची पेण येथे सदिच्छा भेट

सिटी बेल | पेण | घन:श्याम कडू |

आदिवासी प्रकल्प पेण नियोजन कमिटी अध्यक्ष श्री दत्तात्रेय सुपे यांची निवड झाल्याबद्दल रायगड जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष महेंद्रशेठ घरत यांनी रायगड जिल्ह्यातील आदिवासी, कातकरी बांधवांना आदिवासी प्रकल्पच्या माध्यमातून जास्तीत जास्त लाभ मिळण्याबाबत प्रयत्न करणार असल्याचे पेण येथील आदिवासी प्रकल्प अधिकारी श्रीमती शशिकला अहिरराव यांची सदिच्छा भेट घेऊन सांगितले.

यावेळी नवनिर्वाचित आदिवासी प्रकल्प पेण नियोजन कमिटी अध्यक्ष यांनी जिल्हा अध्यक्ष महेंद्रशेठ घरत यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.यावेळी महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस सौ. नंदाताई म्हात्रे, जिल्हा उपाध्यक्ष मिलिंद पाडगावकर, जिल्हा काँग्रेस महिला अध्यक्षा सौ. श्रद्धाताई ठाकूर, अल्पसंख्यांक कार्याध्यक्ष अकलाक शिलोत्री, गणेश सेवक, जगदीश पवार, सौ सुलोचना साबळे व मोठया संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.