Press "Enter" to skip to content

अंडरपासिंगला 7 ते 8 फुटी हाईट गेट्स लावणार

जिल्हा काँग्रेस अध्यक्ष महेंद्रशेठ घरत यांच्या इशाऱ्यानंतर धुतमच्या नागरिकांचे प्रवास सुखकर होणार

सिटी बेल | उरण | घन:श्याम कडू |

धुतुम येथील अंडरपासिंगचे काम करावे. तसेच स्थानिक जनतेच्या प्रलंबित ज्या काही मागण्या आहेत. त्या तातडीने सोडवाव्यात नाहीतर नजीकच्या काळात आम्हांला रस्त्यावर उतरून आंदोलन करावे लागेल असे रोखठोक प्रतिपादन रायगड जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष महेंद्रशेठ घरत यांनी धुतम येथे केले होते. याची दखल अधिकारी वर्गांनी घेऊन अंडरपासिंगला 7 ते 8 फुटी हाईट गेट्स लावण्यास सांगितले आहे. यामुळे धुतमच्या नागरिकांचे प्रवास सुखकर होणार असल्याचे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष महेंद्रशेठ घरत यांनी सांगितले.

रायगड जिल्हा काँग्रेसचे डॅशिंग कार्यसम्राट अध्यक्ष श्री महेंद्रशेठ घरत यांच्या इशाऱ्या नंतर NHI चे मुख्य व्यवस्थापक श्री फेगडे यांनी तातडीने आज धुतम येथे आपल्या संपूर्ण टीम सोबत येऊन या ठिकाणी धुतम गावात जाण्यासाठी परंपरागत असलेला जासई -धुतम जिल्हा परिषद रस्ता या चौपद्री रस्त्यामुळे अडचणीत आला आहे. परंतु चुकीच्या नियोजनामुळे नियोजित ठिकाणापासुनचा अंडरपासिंग रस्ता हा 300 ते 500 मीटर पुढे सरकविण्यात आलाआहे आहे. शाळकरी मुले, विविध ठिकाणी येथील स्थानिक आपल्या उपजीविके साठी, कामानिमित्त बाहेर याच मार्गाचा वापर करून जात आहेत. परंतु चुकीच्या नियोजनामुळे याचा फटका येथील स्थानिक लोकांना व धुतम गावातील लोकांना बसत आहे.

मोठया प्रमाणात अवजड वाहने सर्व्हिस रोड चा वापर करत असल्यामुळे येथील नागरिकांना आपला जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. त्यामुळे लवकरात लवकर येथील अंडरपासिंगचे काम करावे. तसेच येथील स्थानिक जणतेच्या प्रलंबित ज्या काही मागण्या आहेत त्या तातडीने सोडवाव्यात नाहीतर नजीकच्या काळात आम्हांला रस्त्यावर उतरून आंदोलन करावे लागेल असे रोख ठोक प्रतिपादन रायगड जिल्ह्या काँग्रेसचे अध्यक्ष श्री महेंद्रशेठ घरत यांनी धुतम येथे केले होते. त्याला NHI चे फेगडे यांनी ताबडतोब याठिकाणी हायवे वरील सर्व्हिस रोड वर व अंडरपासिंगला 7 ते 8 फुटी हाईट गेट्स लावण्यास सांगितले आहे. पॅकेज 5 चा निर्णय ज्या वेळेस येईल त्या मध्ये हा अंडरपासिंग चे काम 100 टक्के करण्यात येईल असे आश्वासन NHI चे मुख्य अभियंता श्री फेगडे यांनी जिल्ह्या अध्यक्ष श्री महेंद्रशेठ घरत व धुतम ग्रामस्थ यांना दिले. त्याचप्रमाणे कामाला सुरवातही ताबडतोब केली.

यावेळी धुतम ग्रामस्थांनी जिल्हा अध्यक्ष श्री महेंद्रशेठ घरत आभार मानले. यावेळी NHI चे मुख्य अभियंता श्री फेगडे,अधिकारी श्री. यशवंत घोटकर, TIPL चे कुलकर्णी, पोलीस विभागाचे सिनियर इन्स्पेक्टर श्री पाटील,ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच श्री. सचिन ठाकूर, प्रेमनाथ ठाकूर, ग्रामपंचायत सद्स्य श्री रविनाथ ठाकूर, अंगत ठाकूर, राजेश ठाकूर, जासई पंचायत गण काँग्रेस चे अध्यक्ष श्री नंदकुमार ठाकूर, लीलाधर घरत, मनोज ठाकूर, कपिल घरत, सुंदर ठाकूर, व धुतम गावातील ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.