नविन पोसरी मोहोपाडा रस्ता सिमेंट काॕक्रीटीकरणाचा व्हावा – नागरिकांची मागणी
सिटी बेल | रसायनी | राकेश खराडे |
मोहोपाडा ग्रामपंचायत हद्दीतील नागरिकांची लोकसंख्या जवळपास साठ हजारांपेक्षा जास्त आहे.
आसपासच्या गावांसाठी मोहोपाडा बाजारपेठे हेच मुख्य केंद्रबिंदू असल्यामुळे मोहोपाडा शहरात नागरिक खरेदी विक्रीसाठी येत असतात. काही दिवसांपूर्वी पोलीस चौकी ते गुरुकृपा जनरल स्टोर्स हा रस्ता नादरुस्त झाल्यामुळे बाजारहट करण्यासाठी येणाऱ्या नागरिकांना समस्यांचा सामना करावा लागत होता.याची दखल माजी सरपंच संदिप मुढे यांनी घेऊन जिल्हा परिषद फंडातून अतिशय चांगळ्या दर्जाचा रस्ता बनवून व्यापारी वर्गाची व नागरिकांची मने जिंकली आहेत.
नविन पोसरी मोहोपाडा बाजारपेठ असणाऱ्या मरिआई मंदिरासमोरील पेव्हर ब्लाॕक रस्त्यावर खड्डे पडल्याने तो नादरुस्त झालेला आहे.या रस्त्यावरुन प्रवास करताना नागरिकांचे पाय मुरगळून दुखापत झालेल्या आहेत.
खड्ड्यात पाणी साठलेले असल्यास त्यावेळी येथून जाणाऱ्या दुचाकीचा चाक पाण्यात आदल्याने रस्त्यावर चालणाऱ्या नागरिकांच्या कपड्यावर पाणी उडण्याचे प्रकार घडले असून पोलीस चौकी ते गुरूकृपा स्टोर्स समोर बनवीण्यात आलेल्या रस्त्या प्रमाणेच मरिआई मदिर समोरील रस्ता हा सिमेंट काॕक्रीटचा व्हावा अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.








Be First to Comment