Press "Enter" to skip to content

त्याने चक्क ग्रामपंचायत कार्यालयात टाकला कचरा

रेवदंडा ग्रामपंचायत कार्यालयात कचरा टाकल्याप्रकरणी गुन्हा दाखल

सिटी बेल | अलिबाग | अमूलकुमार जैन |

अलिबाग तालुक्यातील रेवदंडा ग्रामपंचायत कार्यलायत दुर्गंधी युक्त कचरा टाकल्याप्रकरणी रमीज रफिक तांडेल (वय 32 वर्षे राहणार-रेवदंडा बाजारपेठ, तालुका:-अलिबाग)यांच्याविरोधात प्रदीप दत्तात्रेय दिवकर(ग्रामविकास अधिकारी, रेवदंडा ग्रामपंचायत कार्यलायत, राहणार-रामराज,तालुका:-अलिबाग) यांनी रेवदंडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

याबाबत रेवदंडा पोलिसांकडून मिळाली असलेली माहिती अशी की,रेवदंडा ग्रुप ग्रामपंचायत कार्यालय येथे दिनांक 2 फेब्रुवारी 2022 रोजी सकाळी अकरा वाजताच्या सुमारास रमीज रफिक तांडेल यास ग्रामपंचायतीचे शासकीय कार्यलाय आहे याची माहिती असतानादेखील तांडेल याने दुर्गंधीयुक्त घाण कचरा कार्यलायत टाकला.त्यामुळे ग्रामपंचायत कार्यालयात दुर्गंधी पसरली.त्यामुळे तिथे काम करणारे यांना काम करण्यास अडथळा निर्माण होऊन कार्यालयाचे विद्रुपीकरण केले.

याप्रकरणी रेवदंडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलीस निरीक्षक अशोक थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक भोईर करीत आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.