जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या विनापरवाना बैलगाडी शर्यती आयोजकांवर गुन्हा दाखल
सिटी बेल | मुरूड जंजिरा | अमूलकुमार जैन |
रायगड जिल्हा अधिकारी यांच्या आदेशाचे उल्लंघन करीत मुरुड तालुक्यातील नांदगाव समुद्र किनारी बैलगाडी शर्यतीचे आयोजन केल्याप्रकरणी आयोजक शैलेश काते आणि इतर आठ तर दहा बैलगाडी धारक यांच्याविरोधात मुरूड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबतची तक्रार पोलीस नाईक परेश म्हात्रे यांनी मुरूड पोलीस ठाण्यात दिली आहे.
याबाबतचे सविस्तर माहिती अशी की,महाराष्ट्रात सद्यपरिस्थित कोरोना संसर्गाचा प्रसार झपाट्याने वाढत असल्याने जिल्हा अधिकारी यांच्या आदेशाचा भंग करीत कोरोना संसर्ग विषाणूचा प्रसार होण्याचा संभव असतानादेखील कोणत्याही प्रकारची परवानगी न घेता 2 फेब्रुवारी 2022 रोजी दुपारी 2:30 ते सायंकाळी 5:30 च्या दरम्यान मुरूड तालुक्यातील नांदगाव ग्रामपंचायत हद्दीतील समुद्र किनाऱ्यावर शैलेश काते आणि इतर आठ ते दहा बैलगाडी धारक यांनी बैलगाडी शर्यतीचे आयोजन केले होते.
याप्रकरणी मुरूड पोलीस ठाण्यात 9/2022 प्रमाणे आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 चे कलम 51 प्रमाणे भा द वि कलम 188, 269,270,34 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अधिक तपास पोलीस निरीक्षक नितीन गवारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक झावरे हे करीत आहेत.








Be First to Comment