सिटी बेल | महाड | समिर बामुगडे |
महानगर गॅस लिमिटेड याच्यां सि आर एस फंडातून अलिम्को यांच्यामदतीने , सहकार्य अपंग कल्याणकारी संस्था रायगड महाराष्ट्र, व श्री समर्थ दिव्यांग कल्याणकारी संस्था महाड रायगड यांच्या सहयोगातून रविवार दिनांक ०६ फेब्रुवारी ते मंगळवार ०८ फेब्रुवारी २०२२ रोजी डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मारक, छत्रपती शिवाजी महाराज चौक महाड येथे मोफत दिव्यांगाना आवश्यक सहाय्यक साधन साहित्य वाटपासाठी तपासणी शिबिर आयोजित करण्यात येत आहे.
ज्या दिव्यांगाना सहाय्यक साधन साहित्याची आवश्कता आहे त्यांनी शिबिरांत तपासणी करण्यासाठी यावे तसेच सहकार्य अपंग कल्याणकारी संस्था रायगड महाराष्ट्रचे सचिव शिवाजी पाटील ९४०३०९२९५५, श्री समर्थ दिव्यांग कल्याणकारी संस्था महाड रायगड अध्यक्षा दिप्ती शेडगे ९९२२२१६५५९, उपाध्यक्ष शैलेश बावळेकर ७७१८०१२१७१,सचिव अनिल जाधव ९८५००५२८७०,खजिनदार मुबीन देशमुख ७२७६५६९५८९, राजेंद्र शिंदे बिरवाडी , विजय खोपकर रायगड, चंद्रकांत पालांडे नाते, श्रीराम सकपाळ शिवथर, आतिफ चाफेकर तुडिल, सुरेश पाटील शिरगांव, सागर शेलार पोलादपूर, आणि संकेत सकपाळ ( युवा संघर्ष संघटना महाड) याच्याशी संपर्क करावा अशी माहिती सहकार्य अपंग कल्याणकारी संस्था रायगड महाराष्ट्रचे सचिव शिवाजी पाटील यांनी दिली आहे.








Be First to Comment