शेलू ग्रामपंचायत हद्दीतील मौजे बेडीसगाव येथील प्रलंबित विकासकामांसाठी भरघोस निधी
सिटी बेल | कर्जत | संजय गायकवाड |
कर्जत तालुक्यातील शेलू ग्रामपंचायत हद्दीतील मौजे बेडीसगाव येथील प्रलंबित विकासकामांसाठी रायगड जिल्हा परिषद उपाध्यक्ष सुधाकर घारे यांच्या कडून भरघोस निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे.
तालुक्यातील शेलू ग्रामपंचायत ही बदलापूर नजीक ग्रामपंचायत असून तेथील आदिवासी वाड्या नेहमीच विकासापासून वंचित राहिलेले आहेत, ही बाब राजिप उपाध्यक्ष सुधाकर घारे यांच्या लक्षात येताच त्यांनी राजिपच्या माध्यमातून विविध विकासकामांसाठी भरघोस निधी देण्यात आला आहे, बेडीसगाव येथील विकासकामांचे भूमिपूजन रायगड जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सुधाकर घारे यांच्या हस्ते पार पडले.
याप्रसंगी उपस्थित महिला तालुकाध्यक्ष रंजना धुळे, राष्ट्रवादीचे जिल्हा युवक उपाध्यक्ष उत्तम पलांडे, बंधू देशमुख, समीर मसणे, मंगल दरवडा आदीसह बेडीसगावमधील कार्यकर्ते आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.








Be First to Comment