Press "Enter" to skip to content

आमदार महेंद्र थोरवे यांचे विशेष प्रयत्न

कर्जत – खालापूर तालुक्यातील पर्यटन स्थळांना पायाभूत सुविधासाठी 6 कोटी 39 लक्ष रुपयांचा निधी

सिटी बेल | कर्जत | संजय गायकवाड |

कर्जत-खालापूर तालुक्यातील पर्यटन स्थळाच्या ठिकाणी पायाभूत सुविधा पुरविण्यासाठी आमदार महेंद्र थोरवे यांच्या विशेष प्रयत्नातून प्रादेशिक पर्यटन विकास योजना सन 2021-22 अंतर्गत कर्जत व खालापूर तालुक्यात 6 कोटी 39 लक्ष रुपयांच्या विकास कामांना प्रशासकीय मान्यता मिळाली आहे.

◆ खांडस येथील शिवमंदिर परिसर सुशोभिकरण करणे ता.कर्जत – (रु.50लक्ष).
◆ साजगाव पुरातन विठ्ठल मंदिर परिसर सुशोभिकरण करणे, ता. खालापूर – (रु.50 लक्ष),
◆ कडाव गणपती मंदिर परिसर सुशोभिकरण करणे, ता.कर्जत – (रु. 50 लक्ष),
◆ ग्रामपंचायत नेरळ येथील सुशोभिकरण करणे – (रु. 100 लक्ष),
◆ ग्रामपंचायत नेरळ गणेश घाट येथे आर.सी.सी संरक्षक भिंत बांधणे – (रु. 90 लक्ष),
◆ ग्रामपंचायत नेरळ येथे (माथेरान पायथ्याशी) असलेले हुतात्मा स्मारक सुशोभिकरण व दुरुस्ती करणे – (रु.20 लक्ष),
◆ भिवपुरी येथील अहिल्यादेवी होळकर तलावाकडून हुमगावकडे जाणारा रस्ता तयार करणे (रु.70 लक्ष)
◆ मौजे भिवपुरी (टाटा कॅम्प) येथील अहिल्याबाई होळकर तलाव परिसरातील रस्त्यांची सुधारणा करणे (रु. 62.60 लक्ष)
◆ मौजे गोळवाडी येथील पुरातन तलाव व अंबोट रस्त्याची सुधारणा करणे (रु.64.68 लक्ष)
◆ उंबरखिंड येथील शिवतीर्थ समरभूमी विकसित करणे (रु. 82.48)

कर्जत व खालापूर तालुक्यातील पर्यटन स्थळ विकास कामांकरिता भरघोस निधी उपलब्ध करून दिल्या बद्दल पर्यटन मंत्री मा. आदित्य ठाकरे व पर्यटन राज्यमंत्री तथा पालकमंत्री मा. आदीती तटकरे यांचे आमदार महेंद्र थोरवे यांनी मनःपूर्वक आभार मानले आहेत.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.