Press "Enter" to skip to content

संस्कार भारतीचे शिबिर कर्जत मध्ये संपन्न

सिटी बेल | कर्जत | संजय गायकवाड |

“संस्कार भारती कर्जत समितीचे एकदिवशीय शिबिर नुकतेच संपन्न झाले, या शिबिरात कर्जत, पनवेल व नवीन पनवेल या समित्यांचे एकत्रीकरण या स्वरुपाचा हा कार्यक्रम होता.

कै. अनंत श्रीधर ओक वनौषधी संशोधन व संवर्धन यांच्या सभागृहांत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते सायली कुंभार व शिल्पा गुजराथी यांनी काढलेली आकर्षक रांगोळी उपस्थितांचे लक्ष वेधून घेत होती. नटराज पुजन व दीप प्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात चांगली झाली. कोकण प्रांताचे पदाधिकारी संजय गोडसे, गणेश वाणी, विजय काळे, शैलेश भिडे, चेतन कोळंबकर व सुनिता खरे तसेच ओक वनौषधीचे व्यवस्थापक सदशिव कुलकर्णी व कर्जतचे पांडुरंग गरवारे आणि भारती म्हसे उपस्थित होते.

संस्थेचे धेय्यगीत सुरेखा शितोळे, स्मिता भोळे, दिनीती सावंत, भारती म्हसे व स्नेहा गोगटे यांनी सादर केले, मान्यवरांचे स्वागत गुलाबपुष्प देऊन करण्यात आले. परिचय सत्रांत सर्व उपस्थितांनी आपआपली ओळख करून दिली. सौ. दळवी हे ओक वनौषधीचे प्रतिनिधीही उपस्थित होते, त्यांनी या प्रकल्पाची माहिती दिली. इतर सत्रांमध्ये कोकण प्रांताचे पदाधिकारी यांनी संस्कार भारतीची नवीन रचना, उद्देश व अपेक्षित कार्य व विविध कलांच्या माध्यमातून करण्यात येणारे कार्यक्रम इत्यादी समजावून दिले. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन स्नेहा गोगटे व .उमा जोशी यांनी केले.आभार प्रदर्शन भारती म्हसे यांनी केले.

शेवटच्या सत्रात विविध गुणांचे सादरीकरण करण्यात आले. यामध्ये जशोदा देवडा,छाया कुलकर्णी, स्नेहा गोगटे, लता कुलकर्णी, हर्षा तळवलकर, भारती देशपांडे, तृप्ती पाटिल,पांडुरंग गरवारे, शिल्पा गुजराथी, वर्षा जोशी कु. शुभम् गुजराथी, सुनिता खरे, शरयु चिलेकर, वैजयंती बुवा व वैशाली कुलकर्णी यांनी सहभाग घेतला.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.