Press "Enter" to skip to content

विद्यार्थ्यांना वाहतुकीच्या नियमांबाबत मार्गदर्शन शिबिर

विद्यार्थ्यांनी वाहतुकीच्या नियमांचे पालन करावे — साहाय्यक फौजदार जी.डी.लवटे

सिटी बेल | पेण | वार्ताहर |

केंद्रासह राज्य सरकारने वाहतुकीच्या नियमांबाबत अधिक कडक पावले उचलली असल्याने वाहन चालविताना हेल्मेट, सिट बेल्ट लावणे, गाडी परवाना जवळ ठेवणे यासह अन्य वाहतूक नियमांचे विद्यार्थ्यांनी पालन करावे अशा सूचना वाहतूक शाखेचे साहाय्यक फौजदार जी.डी.लवटे यांनी विद्यार्थ्यांना दिल्या.

रायगड जिल्हा पोलिस अधीक्षक अशोक दुधे, अप्पर पोलिस अधीक्षक झेंडे, पेण डीवायएसपी वि.भा.चव्हाण, पोलिस निरीक्षक देवेंद्र पोळ, वाहतूक शाखेचे पोलिस निरीक्षक राजेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पेण मधील सार्वजनिक विद्यामंदिर व ज्युनिअर कॉलेज येथे विद्यार्थ्यांना वाहतुकीच्या नियमांबाबत मार्गदर्शन शिबिर आयोजित करण्यात आले होते‌.

यावेळी लवटे यांनी पुढे सांगितले की सध्या अनेक विद्यार्थी लायसन्स नसतानाही मोटारसायकल वरून ट्रिपल सिट फिरणे, पोलिसांनी हात दाखविला तर पळून जाणे, रस्ता ओलांडताना त्याचा अंदाज न घेणे, लायसन्स न काढणे, हेल्मेट न वापरणे यासर्व गोष्टी वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणा-या असल्याने यासाठी आमच्याकडे असणारे कॅमेरे जवळपास १०० मिटरवर कॅच करत आहेत.त्यामुळे वाहतूक नियमांचे पालन करणे गरजेचे असल्याचे त्यांनी शेवटी सांगितले.

यावेळी सार्वजनिक विद्यामंदिरचे प्राचार्य एम.एन.पाटील, मोरे,पोलिस हवालदार सुर्यकांत गावंड, विनायक पाटील, सुप्रेश म्हात्रे आदिंसह शिक्षक उपस्थित होते.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.