Press "Enter" to skip to content

वाशी पंचक्रोशीचा सर्वांगीण विकास करणार – सरपंच गोरख पाटील

सिटी बेल | पेण | प्रशांत पोतदार |

पेण तालुक्यातील वाशी पंचक्रोशीत सर्वांगीण विकास करून वाशी विभागाचा चेहरामोहरा बदलणार असे प्रतिपादन वाशी चे सरपंच गोरख पाटील यांनी केले.

पेणचे आमदार रविशेठ पाटील यांच्या माध्यमातून वाशी विभागाच्या सर्वांगीण विकासाकरिता सुमारे ५० लाखांचा निधी उपलब्ध करून दिली आहे. तसेच जे एस डब्ल्यु कंपनीच्या माध्यमातून ५० लाखोंचा निधी मंजूर करण्यात आला आहे.

या विकास निधीतून वाशी पंचक्रोशीतील अंतर्गतरस्ते, अंगणवाडी दुरुस्ती, प्राथमिक शाळा सरेभाग वर्गखोली दुरुस्ती, वाशी जगदंबा माता मंदिर रस्ता दुरुस्ती व सार्वजनिक शौचालय, गटर, संरक्षण भिंत यासह इतर अनेक विकास कामे करून वाशी पंचक्रोशी चा विकास साधण्यात येणार आहे अशी माहिती सरपंच गोरख पाटील यांनी दिली.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.