२० हजारांची लाच घेताना सरपंच अतुल तांबे याला लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने घातल्या बेड्या
सिटी बेल | पनवेल |
पनवेल तालुक्यातील उसर्ली ग्रामपंचायतीचे सरपंच अतुल अनंत तांबे याने पनवेल येथील मौजे डेरवली मातोश्री सोसायटी समोरील रस्ता तसेच मौजे डेरवली बस थांबा ते साई निकेतन पर्यतचा रस्ता कॉन्केटिकरण करण्याचे विकास कामाचे मुल्यांकन दाखल्यावर स्वाक्षरी करण्याकरीता कॉन्ट्रक्टर यांच्या कडे लाचेची मागणी केली होती.
ही तक्रार कॉन्ट्रक्टर यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे केली होती. त्यानुसार या लाचखोर सरपंचाला रंगेहाथ पकडण्यासाठी सापळा रचण्यात आला. यावेळी सरपंच अतुल तांबे याने २५०००/- रूपयांची लाच मागितली असता कॉन्ट्रक्टर यांनी २००००/- रूपये देण्याचे कबूल केले. त्यानंतर विचुंबे गाव, नविन पनवेल, याठिकाणी रू. २०,०००/- लाचेची रक्कम स्विकारताना सरपंच अतुल तांबे याला रंगेहाथ पकडण्यात आले.








Be First to Comment