सिटी बेल लाइव्ह / उरण / रमेश थळी #
रेवस-पेण मधील भाजी विक्रेते उरण तहसील कार्यालयाकडे जाणाऱ्या रस्त्यावर बसल्यामुळे भाजी खरेदी करणार्या ग्राहकांच्या गर्दी मुळे उरणमध्ये कोरोनाचा धोका वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.
राज्यात कोरोना रोगाचा वाढता धोका लक्षात घेऊन हा धोका कमी व्हावा यासाठी प्रशासन युद्ध पातळीवर प्रयत्न करीत आहे. या रोगाचा प्रादुर्भाव रायगड जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात आहे. अलिबाग, पेण येथे कोरोनाचे रूग्ण संखेत वाढ होताना दिसत आहे. अलिबाग मध्ये जिल्हा अधिकारी कार्यालयात कोरोनचा शिरकाव झाल्याने खबरदारी म्हणून १/२/३ आॅगष्ट २०२० पर्यंत तीन दिवस रायगड जिल्हाअधिकारी कार्यालय बंद ठेवण्यात आले असल्याची बातमी प्रसिद्ध झाली आहे. ही अशी परिस्थिती निर्माण झाली असताना आणि उरण शहरात दिवसेंदिवस कोरोना रूग्ण वाढत असताना याची खबरदारी उरण नगर परिषदेने घेण्याची गरज आहे. पालीका प्रशासने याची दखल घेतली पाहिजे. हे गांभिर्य लक्षात घेऊन ही परिस्थिती हाताबाहेर जाण्याआधी यावर उपाय योजना करावी अशी मागणी सुज्ञ नागरीकांकडून होत आहे.






Be First to Comment