Press "Enter" to skip to content

रसायनी पोलिस ठाण्यात मोफत रक्त तपासणी शिबिर

सिटी बेल | रसायनी | राकेश खराडे |

मोहोपाडा नवीन पोसरी येथील लाईफ केअर डायग्नाॅस्टीक सेंटर यांच्यामार्फत कै.स्वप्निल पाटील यांच्या जयंतीनिमित्त रसायनी पोलिस ठाण्यातील पोलिस बांधवांची रक्ततपासणी शिबिर पार पडले.

यावेळी 32 पोलिसांची सिबिसी,शुगर फास्टिंग, कोलेस्टेरॉल,युरीक अॅसिड, ईसिजी आदी मोफत तपासण्या करण्यात आल्या.यावेळी रसायनी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कैलास दादाभाऊ डोंगरे यांनी लाईक केअर डायग्नाॅस्टीक सेंटरने मोफत रक्ततपासणी सुविधा उपलब्ध केल्याने त्यांच्या लॅबोरेटरी टिमचे आभार मानले.रसायनी पोलिस ठाण्यात झालेल्या मोफत रक्ततपासण्या शिबिराला पोलिस बांधवांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.