Press "Enter" to skip to content

पवार दांपत्याचा सहस्त्र चंद्रदर्शन सोहळा

सौ.वेणूबाई व विठोबा पवार यांचा सहस्त्र चंद्रदर्शन सोहळा उत्साहात संपन्न

सिटी बेल | खांब-रोहे | नंदकुमार मरवडे |

रोहे तालुक्यातील खारी या गावचे प्रतिष्ठित नागरिक तथा जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते श्री. विठोबा भिकू पवार व त्यांच्या सौ.वेणूबाई विठोबा पवार यांचा सहस्त्र चंद्रदर्शन सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न करण्यात आला.

श्री. सौ.वेणूबाई विठोबा पवार यांचे सुपुत्र अनंत,हरिश्चंद्र व रमेश तर सुकन्या निर्मला, गुलाब आणि प्रमिला यांच्या संकल्पनेतून संपन्न झालेल्या या सहस्त्र चंद्रदर्शन सोहळ्याप्रसंगी येथील सरपंच सौ.आपणकर, युवा नेते सतेज आपणकर,
अध्यक्ष खारी काजूवाडी,अध्यक्ष दत्तात्रय चिमाजी काळे, अनंत मारुती शिर्के,माजी सरपंच महादेव माहीत,बबन कुळे,राजेंद्र खिरिट,यशवंत माहीत आदी प्रमुख मान्यवर यावेळी उपस्थित होते.

अतिशय प्रमाणिकपणे आपला शेती व्यवसाय व शेती पूरक व्यवसाय सांभाळून आपल्या परिवार व समाजासाठी बहुमोल योगदान देऊन कार्यरत असणारे विठोबा पवार यांच्या आयुष्याला ८५ वर्षे पूर्ण झाल्याने त्यांच्याप्रति क्रुतज्ञता भाव व्यक्त करण्यासाठी समस्त पवार व आप्तस्वकीय सगेसोयरे यांनी आयोजित केलेल्या या सहस्त्र चंद्रदर्शन सोहळ्यातंर्गत अत्यंत धार्मिक व अध्यात्मिक वातावरणात धार्मिक पूजाविधी,श्री. सौ.वेणूबाई विठोबा पवार यांचे ८५ दिव्यांची ओवाळणी करून केक कापून हा विधी साजरा करण्यात आला. तसेच श्री. विठोबा पवार यांची साखरेतून व रेणूबाई यांची गुळातून तुला करण्यात आली.

या सोहळ्याचे औचित्य साधून त्यांची नातवंडे व पतवंडं यांनी आजी आजोबांचे जुने फोटो,सजवलेली बैलगाडी,भात भरडण्याची घटी आदी देखावे सादर करून जुन्या आठवणींना उजाळा दिला.तर वडाचे झाडाचे चित्र रेखाटून बहरलेल्या वडातून संपूर्ण पिढीचे दर्शन घडविलेले दर्शन सा-यांचे लक्ष वेधून घेत होते..

खारी-काजूवाडी परिसरात पहिल्यांदाच अशाप्रकारचा कार्यक्रम संपन्न झाल्याने अनेकांनी समाधान व्यक्त केले. याशिवाय श्री व सौ.वेणूबाई विठोबा पवार यांना शुभेच्छा देण्यासाठी त्यांचे आप्तस्वकीय, मित्र परिवार व सगेसोयरे तसेच ग्रामस्थ मंडळ यांनी अक्षरक्ष: फार मोठी गर्दी केली होती.
तर बबन कुळे यांनी पवार दांम्पत्यांप्रती सुंदरसे भावगीत सादर करून उपस्थितीतांची मनं जिंकली. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपसरपंच नितीन मालुसरे यांनी केले. तर सुत्रसंचलन नंदकुमार मरवडे यांनी केले.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.