Press "Enter" to skip to content

जासई – धुतम रस्ता चौपद्री रस्त्यामुळे अडचणीत

धुतम येथील अंडरपासिंगचे काम तातडीने करा अन्यथा हायवे जाम करू : महेंद्रशेठ घरत

सिटी बेल | उरण | घन:श्याम कडू |

स्थानिक प्रकल्पग्रस्तांच्या जमिनी विकासाच्या नावाने कवडीमोल भावाने घेऊन. आज येथील प्रकल्पग्रस्तांना उध्वस्त करण्याचे षडयंत्र रचले जात आहे. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 4 चे चौपद्री करणाचे काम अंतिम टप्यात आहे. परंतु धुतम गावात जाण्यासाठी परंपरागत असलेला जासई -धुतम जिल्हा परिषद रस्ता या चौपद्री रस्त्यामुळे अडचणीत आला आहे. परंतु चुकीच्या नियोजनामुळे नियोजित ठिकाणापासुनचा अंडरपासिंग रस्ता हा 300 ते 500 मीटर पुढे सरकविण्यात आला आहे. त्यामुळे स्थानिक लोकांच्या आडचणीत खुप वाढ झाल्या आहेत. शाळकरी मुले, विविध ठिकाणी येथील स्थानिक आपल्या उपजीविकेसाठी, कामानिमित्त बाहेर याच मार्गाचा वापर करून जात आहेत. परंतु चुकीच्या नियोजनामुळे याचा फटका येथील स्थानिक लोकांना व धुतम गावातील लोकांना बसत आहे. येथील स्थानिक लोकप्रतिनिधीना याचे कोणतेही सोयरसुतक पडलेला नाही. या लोकप्रतिनिधीचा कोणताही वचक या अधिकाऱ्यांवर राहिलेला नाही. त्यामुळे हे अधिकारी कोणाला जुमानत नाहीत. याचा फटका येथील स्थानिक प्रकल्पग्रस्तांना बसत आहे.

येथील स्थानिकांच्या जमिनी कवडीमोल भावाने घेऊन. ज्यांच्या जीवावर आज या ठिकाणी जे वैभव आपण पाहतआहात. ते येथील प्रकल्पग्रस्तांनी आपल्या पिकत्या जमिनी कवडीमोल भावाने या विकासासाठी दिलेल्या आहेत.परंतु या ठिकाणी प्रकल्पग्रस्तांना वाऱ्यावर सोडले जात आहे.मोठया प्रमाणात अवजड वाहने सर्व्हिस रोड चा वापर करत असल्यामुळे येथील नागरिकांना आपला जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. त्यामुळे लावकरात लवकर येथील अंडरपासिंगचे काम करावे. तसेच स्थानिक जनतेच्या प्रलंबित ज्या काही मागण्या आहेत. त्या तातडीने सोडवाव्यात नाहीतर नजीकच्या काळात आम्हांला रस्त्यावर उतरून आंदोलन करावे लागेल असे रोखठोक प्रतिपादन रायगड जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष महेंद्रशेठ घरत यांनी आज धुतम येथे केले. येथील ग्रामस्थांनी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 4 B च्या अधिकाऱ्यांना येथील प्रत्यक्ष जागेवर बोलावून पाहणी करण्यास सांगितली. हा सर्व अनिधिकृत कारभार त्यांच्या लाक्षत आणुन दिला.

यावेळी NHI चे मुख्य अभियंता श्री फेगडे यांनी दोन दिवसात या संदर्भात बैठक लावुन सन्मानजनक तोडगा काढण्याचे आश्वासन जिल्हा अध्यक्ष महेंद्रशेठ घरत यांना दिले. यावेळी धुतम ग्रामपंचायततीचे माजी उपसरपंच सचिन ठाकूर, प्रेमनाथ ठाकूर, ग्रामपंचायत सद्स्य रविनाथ ठाकूर, अंगत ठाकूर, राजेश ठाकूर, जासई पंचायत गण काँग्रेसचे अध्यक्ष नंदकुमार ठाकूर, लीलाधर घरत, मनोज ठाकूर, कपिल घरत, सुंदर ठाकूर,NHI चे अधिकारी श्री. यशवंत घोटकर साहेब, TIPL चे कुलकर्णी साहेब व धुतुम गावातील ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.