द.ग.तटकरे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय कोलाड येथे ११ वी टेक्निकल प्रवेश प्रकिया सुरु
सिटी बेल लाइव्ह / गोवे-कोलाड (विश्वास निकम )
सुधागड एज्युकेशन सोसायटी पालीचे द.ग.तटकरे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय कोलाड येथे १० वी.उत्तीर्ण विद्यार्थ्यांनीसाठी ११वी टेक्निकलसाठी प्रवेश प्रक्रिया सुरु झाली असुन यासाठी फक्त २५ विदयार्थ्यांना प्रवेश दिला जाणार आहे.या टेक्निकल वर्गामुळे विद्यार्थ्यांसाठी विविध फायदे होणार आहेत.
यामध्ये ११वी व १२वी टेक्निकल नंतर थेट पॉलटेक्निकल मध्य प्रवेश मिळतो.विविध आस्थापणात शिकाऊ उमेदवारी(अँप्रेटिशिप)मिळते,शासकीय व निमशासकीय आस्थापणामध्ये नोकरी मिळते,तारतंत्री (इलेक्ट्रिशियन) सुपरव्हाजरचा लायसन मिळतो, एप्लॉयमेंट ऑफिसमध्ये प्रशिक्षित टेक्निशियन म्हणुन वेगळ्या वर्गवारीत नोंद,स्वयंमरोजगार सुरु करण्यासाठी विविध वित्तीय संस्थाकडून कर्जपुरवठा, विद्युत क्षेत्रात स्वतःचा व्यवसाय सुरु करता येतो.
घरगुती व कर्मशिअल वायरिंग फिटिंग, विद्युत उपकरणाची निघा,दुरुस्ती व विक्री,मोटार रिवायडिंग,फ्रिज,एअर कंडिशनर,वाशिंग मशीन दुरुस्ती,यांचे प्रशिक्षण,याशिवाय बारवी पास नंतर बीए./बी.कॉम प्रथम वर्ष येथे प्रवेश घेता येतो. त्यामुळे या सुवर्ण संधीचा फायदा घेण्यासाठी प्रवेश प्रक्रिया सुरु झाली असुन फक्त पहिल्या २५ विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाणार असणार असल्याचे द.ग.तटकरे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य श्रीराम काळे यांनी सांगितले असून यासाठी डी.आर.पाटील ७७७६९३७३४१,व जी.डी.घोणे ९०२८५३९९३१ यांच्याशी संपर्क साधावा असे सांगण्यात येत आहे.






Be First to Comment