सिटी बेल | रसायनी | राकेश खराडे |
वासांबे मोहोपाडा ग्रामपंचायत हद्दीतील शिवनगर येथील राजिप शाळेतील विद्यार्थ्यांची रक्तगट तपासणीसह इतर तपासण्या व्हाव्यात यासाठी लाईफकेअर डायग्नाॅस्टीक सेंटर यांच्यामार्फत कै.स्वप्नील पाटील यांच्या जयंतीनिमित्त रा.जि.प.शाळा शिवनगर येथे शालेय विद्यार्थ्यांसाठी व वाडीतील इतर रहीवाशांसाठी रक्तगट तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. सदर शिबिराचा 150 विद्यार्थी व आसपासच्या आदीवासी बांधवांनी लाभ घेतला.

सर्जेराव पाटील,विनायक गायकवाड,तृप्ती पाटील,संदेश गायकवाड,प्राची माळी यांनी शिबिर यशस्वी करण्यासाठी अथक परिश्रम घेतले.यावेळी माजी सरपंच संदिप मुंढे, संतोष पाटील, ग्रामपंचायत सदस्य संतोष मैदर्गींकर,नंदू कुरंगळे, विश्वास माळी,नयन म्हात्रे आदी उपस्थित होते.
रक्ततपासणी शिबिर यशस्वी करण्यासाठी शाळेच्या मुख्याध्यापिका रजनी गायकवाड व मंदार वेदक सर यांनी मोलाचे सहकार्य केले.








Be First to Comment