सावळे येथील मारुती माळी राज्यस्तरीय कार्य गौरव पुरस्काराने सन्मानित
सिटी बेल | रसायनी | राकेश खराडे |
पोलीस मित्र युवा महासंघ महाराष्ट्र राज्य यांच्यावतीने सामाजिक, शैक्षणिक व सांस्कृतिक क्षेत्रात भरीव कामगिरी करणाऱ्यांना देवाची आळंदी येथे राज्यस्तरीय गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
यावेळी वारकरी सांप्रदायातील तसेच सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या रसायनीतील सावळे गावचे मारुती दिनकर माळी यांच्या कार्याबद्दल राज्यस्तरीय कार्य गौरव पुरस्काराने मान्यवरांच्या उपस्थितीत गौरविण्यात आले.सन्मानचिन्ह, सन्मानपत्र व शाल असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.यावेळी मान्यवर म्हणून पोलिस मित्र युवा महासंघाचे संस्थापक अध्यक्ष नितीन जैस्वाल, प्रदेश महिला अध्यक्षा नम्रताताई भाडा, प्रदेश कोषाध्यक्ष शरद कवानकर, महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष प्रवीण बोबडे आदी उपस्थित होते.

दरम्यान सावळे रसायनी येथील मारुती दिनकर माळी (एन.डि.माळी)हे विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून काम पाहत आहेत.शिवाय वारकरी सांप्रदाय कोकण दिंडी रसायनी खालापूर पायी दिंडी धर्मंशाळेचे खजिनदार म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत.तसेच महात्मा फुले समता परिषदेचे कोकण विभागीय संघटक आहेत.त्यांना वारकरी सांप्रदायाची आवड असल्याने ते पायीदिंडी न चुकविता करत असतात.त्यांना देवाची आळंदी येथे राज्यस्तरीय कार्य गौरव पुरस्काराने सन्मानित केल्याने त्यांच्यावर सर्वंत्र अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.








Be First to Comment