उरणमध्ये प्रत्येक निवडणूकीत भगवा झेंडा फडकविणार — माजी आमदार भोईर
सिटी बेल | उरण | घनश्याम कडू |
शिवसेना नवीन शेवा शाखेचा 34 वा वर्धापनदिन व हळदीकुंकू कार्यक्रम शिवसेना जिल्हाप्रमुख माजी आमदार मनोहरशेठ भोईर यांच्या अध्यक्षतेखाली नवीन शेवा येथे संपन्न झाला. यावेळी महिला आघाडीतर्फे हळदीकुंकू कार्यक्रमाचे सुध्दा आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमास मार्गदर्शन करताना शिवसेना जिल्हाप्रमुख माजी आमदार मनोहरशेठ भोईर म्हणाले की, शिवसेना नवीन शेवा शाखेचा 34 वा वर्धापनदिन साजरा होत आहे म्हणजे आमच्याही राजकीय व सामाजिक जीवनाला 34 वर्ष पूर्ण होत आहेत. यापुढे मागचे सर्व विसरून उरण तालुक्यातील सर्व पदाधिकारी व शिवसैनिक यांनी एकत्र येऊन टीमवर्क ने काम करून उरण नगरपालिका, जिल्हा परिषद-पंचायत समिती, ग्रामपंचायत व उरण विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचा भगवा झेंडा फडकविण्याचा निर्धार करू या असे आवाहन केले.
माजी जिल्हाप्रमुख व जे एन पी टी चे विश्वस्त दिनेश पाटील यांनी मार्गदर्शन करताना म्हणाले की, भाजपावाले नवी मुंबई विमानतळाच्या नामांतराचा राजकारण करून जाणून बुजून आपल्या समाजात फूट पाडण्याचा प्रयत्न करून आपली राजकीय पोळी भाजत आहेत. म्हणून शिवसेनेच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी संघटना बांधणीसाठी दिवसरात्र काम करून उरण विधानसभा मतदारसंघात शिवसेनेची मोठी ताकद उभी करून पुढचा आमदार शिवसेनेच निवडून आणण्यासाठी संकल्प करावा.
यावेळी उपजिल्हाप्रमुख नरेश राहळकर, तालुकाप्रमुख संतोष ठाकूर, तालुका संपर्कप्रमुख जे. पी. म्हात्रे, जिल्हा परिषद सदस्य श्री विजय भोईर व महिला तालुका संघटिका सौ भावना म्हात्रे यांनी आपले मनोगत व्यक्त केले तर उपतालुका संघटक के. एम. घरत यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.

या कार्यक्रमास विधानसभा संपर्क प्रमुख महादेव घरत, शहर संपर्कप्रमुख गणेश म्हात्रे, पंचायत समिती सदस्य हिराजी घरत, आरोग्य कक्षाचे जिल्हा समन्वयक रमेश म्हात्रे, उपतालुकाप्रमुख कमलाकर पाटील, शिक्षक नेते नरेश मोकाशी, द्रोणागिरी शहरप्रमुख जगजीवन भोईर, उपतालुका संघटक अमित भगत, माज विभागप्रमुख मधुकर ठाकूर, सरपंच आदिनाथ भोईर, शहर संघटिका सौ वीणा तालरेजा, शहर संघटिका सौ मेघा मेस्त्री, संपर्क संघटिका श्रीमती वंदना पवार, उपशहर संघटिका सौ माधुरी चव्हाण, सौ अर्चना भोईर, मुमताज भाटकर, रुबिना कुट्टी, संगीता लोळगे, रजनी लोळगे, विभागप्रमुख श्री भूषण ठाकूर, श्री रजनीकांत पाटील, अल्पसंख्याक सेलचे एजाज मुकादम, शादाब शेख, रिहान भाटकर नागाव सरपंच सी के गायकवाड, मोहन थळी, अविनाश म्हात्रे, तालुक्यातील पदाधिकारी, शाखाप्रमुख, कार्यकर्ते व मोठया संख्येने महिला वर्ग उपस्थित होते.








Be First to Comment