अशी अंगणवाडी सेविका आता मिळणे नाही
सिटी बेल लाइव्ह / कळंबोली / प्रतिनिधी #
पुनाडे गावातील अंगणवाडी सेविका रंजना ( हैळू) रामकृष्ण पाटील यांचे वयाच्या 60 व्या वर्षी अल्पशा आजाराने निधन झाले त्यांच्यावर पुनाडे येथील वैकुठधाम स्मशानभुमीत शोकाकुल वातावरणात अत्यंसंस्कार करण्यात आले. जो आवडे सर्वाना तोची आवडे देवाला ! त्याप्रमाणे त्या सर्वांच्या आवडत्या होत्या.
त्यांच्या निधनाने पुनाडे गावावर शोककळा पसरली आहे. अंगणवाडी सेविका म्हणून त्यांनी अनेक विद्यार्थी घडविले गावच्या लाडक्या असलेल्या रंजना पाटील यांना वयस्कर व्यक्ती मुलगी, त्यांच्या वयाच्या व्यक्ती बहिण तर लहान त्यांना आईच् समजत असत. सर्वांच्या लाडक्या असल्याने त्या सर्वांच्या सुखदुखात सामिल होत असते. त्यांनी गावाच्या विकासासाठी त्यांचे मोलाचे सहकार्य आहे. त्यांना वैर माहीत नसल्याने त्यांच्यात एवढा स्नेहभाव कुठून आला याचे सर्वाना आश्चर्य वाटत होते. त्यांना पती, दोन मुले, एक मुलगी व नातवंडे असा परिवार आहे.
पुनाडे गावाला आता अशी अंगणवाडी सेविका मिळणे नाही. अनेक मुलांना त्यांनी शाळेचे वळण लावले त्यांचे गावावर मोठे उपकार आहेत. चंद्रकांत कमळ पाटील, सदस्य - पुनाडे ग्रामपंचायत






Be First to Comment