श्रीवर्धनसारखे ऐतिहासिक शहर देश पातळीवर घेऊन जाणार : खा. सुनील तटकरे
श्रीवर्धन नगरपालिका नंबर वन करण्याच खा. सुनील तटकरे साहेबांचे स्वप्न : पालकमंत्री आदिती तटकरे
सिटी बेल | श्रीवर्धन | विजय गिरी |
उभ्या महाराष्ट्रात पहिली क वर्ग नगरपालिकेत होत आसेलली डिजिटल लायब्ररी श्रीवर्धनमध्ये होत असल्याचा अभिमान खा. सुनील तटकरे यांनी व्यक्त केला. गुलधे येथील साकव भूमिपूजन, श्रीवर्धन मधील डिजिटल लायब्ररी भूमिपूजन खा. सुनील तटकरे व पालकमंत्री आदितीताई तटकरे यांच्या हस्ते संपन्न झाला.
यावेळी व्यासपीठावर तालुका अध्यक्ष दर्शन विचारे, शहरअध्यक्ष जितेंद्र सातनाक, डॉ अबू राऊत, माजी नगराध्यक्ष फैसल हुर्जुक, हरिहरेश्वर सरपंच अमित खोत, यशवंत चौलकर, सुनील पवार आदी मान्यवर उपस्थित होते.

श्रीवर्धन सारख ऐतिहासिक शहराला देश पातळीवर घेऊन जाण्याचं प्रयत्न करणार असल्याचं वक्तव्य खा सुनील तटकरे यांनी व्यक्त केलं. राज्यात मी पुन्हा येईनचा नारा लावणार्ऱ्यांना पवार साहेब उद्धवजीनी दाखवलं आणि महाविकास आघाडीचे सरकार स्थापन केला. या सरकार मधील मंत्री म्हणून काम करत असलेल्या पालकमंत्री आदितीताई तटकरे यांच्या संकल्पनेतून साकार होत असलेल्या डिजिटल लायब्ररीचे अनेक फायदे होणार असून. बुद्धिमत्तेची खान असलेल्या कोकणातील आकलन शक्तीचा योग्य पद्धतीने उपयोग होण्यासाठी ही डिजिटल लायब्ररी उपयोगी पडणार आहे. याच लायब्ररीमध्ये एम पी एस सी आय पी एस सी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा सत्कार झाला पाहिजे अशी आशा व्यक्त केली. यावेळी बोलताना डम्पिंग ग्राउंड चा प्रश्न मोठं मोठ्या नगरपालिकेत सर्वत्र आहे. मात्र श्रीवर्धन पालिकेच्या डम्पिंडचा राजकीय भांडवल केलं जातं असल्याचं खा. तटकरे म्हणाले. शहर बदलत असून पर्यटकांना वाटलं पाहिजे कुलू मनाली उटीला जाण्यापेक्षा इथे येऊन राहावं अस श्रीवर्धन करण्याचं स्वप्न असल्याचं मत खा तटकरे यांनी व्यक्त केलं.

ना. आदितीताई तटकरे श्रीवर्धनला शैक्षणिक क्षेत्रात चांगलं वलय लाभावे. या लायब्ररीमध्ये यु पी एस सी एम पी एस सी चे त्याचबरोबर कोळी बांधवाना प्रशिक्षण शिबीर आयोजित करण्यात येतील. श्रीवर्धन तालुक्यातील जनतेने काम करण्याची संधी दिली. शैक्षणिक क्षेत्राबरोबर शहरासाठी क्रीडा संकुल विध्यार्थ्यांच्या उज्वल भविष्यासाठी उभारण्यात येणार आहे. यावेळी राज्यस्तरीय किंवा राष्ट्रस्टरीय पुरस्कार श्रीवर्धन नगरपालिकेला मिळावा अशी आशा ना. आदितीताई तटकरे यांनी व्यक्त केली. श्रीवर्धन नगरपालिकेच्या स्वच्छतेचं कौतुक करावे तितकं कमी आहे असल्याचं मत देखील पालकमंत्री ना. आदितीताई तटकरे यांनी व्यक्त केला.








Be First to Comment