Press "Enter" to skip to content

पेण शहराच्या सौंदर्यात भर

कोळी समाजाचे प्रतिक असणा-या नाखवा आणि नाखविण पुतळ्याचे अनावरण

सिटी बेल | पेण | वार्ताहर |

मुंबई पुणे या सारख्या मोठ्या शहरांमध्ये विविध चौकात वेगवेगळ्या पुतळ्याची उभारणी करण्यात येत असून यामुळे शहराला सौंदर्य प्राप्त होय आहे.त्याच अनुषंगाने पेण कोळीवाडा येथील चौकात प्रजासत्ताक दिनानिमित्त कोळी समाजाचे प्रतिक असणा-या नाखवा आणि नाखविण या पुतळ्याचे आनावण समाजातील जेष्ठ नागरीक यांच्या हस्ते करण्यात आले.

पेण हे गणपतीचे माहेरघर म्हणून जगात ओळख आहे.या अगोदर पेण शहरात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासह कासार तलाव मध्ये साई मंदिर, कंवडाल तलाव, मोतिराम तलाव येथील सुशोभीकरण, म्हाडा काँलनी येथील थीम पार्क यामुळे शहराला एक वेगळा लूक आला असताना आता शहरातील कोळी समाजाच्या वतीने एकत्र येत स्वखर्चाने कोळीवाडा चौकात नाखवा आणि नाखविण यांची प्रतिकती असणारा पुतळा उभारल्याने शहरातील सौदर्यात आणखीनच भर पडली आहे.

सदर पुतळा पाहण्यासाठी तालुक्यातील अनेक तरुण तरुणी जेष्ठ नागरीक येत असून रात्रीच्या प्रकाशात हा सेल्फी पाँइंट झाला आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.