Press "Enter" to skip to content

आर.के.एफ.जे.एन.पी. व्ही.शाळेचे घवघवीत यश

कु.वैष्णवी चव्हाण हिने 95.40% गुण मिळवून शाळेत प्रथम

सिटी बेल लाइव्ह / पाली/बेणसे.(धम्मशिल सावंत)

आर.के.एफ.विबग्योर संस्थेच्या जवाहरलाल नेहरू पोर्ट विद्यालय शेवा ने यावर्षी एस.एस.सी. निकालाची परंपरा कायम राखीत घवघवीत यश संपादन केले आहे.

यावर्षी मराठी माध्यमाचा निकाल 98.75% लागला तर इंग्रजी माध्यमाचा निकाल 97.48%लागला.मराठी माध्यमातून कु.वैष्णवी रमेश चव्हाण हिने 95.40%गुण मिळवून शाळेत प्रथम व तालुक्यात दुसरी आली ,तर इंग्रजी माध्यमातून कु.ऋतुजा राजेंद्र ठाकूर हिने 93.80% गुण मिळवून शाळेत प्रथम व तालुक्यात आठवी आली. तसेच शाळेतून मराठी माध्यमातून अनुक्रमे द्वितीय कु.प्रियांशी जयेंद्र भोईर 94.40%तर तृतीय कु. समृध्दी राजेश म्हात्रे 91.00% आहेत.तर इंग्रजी माध्यमातून अनुक्रमे द्वितीय कु.सोहम सतीश शेडगे 93.60%तृतीय मृणली शैलेंद्र ठाकूर 93.20% आहेत .

या उत्तुंग यशात शाळेचे मुख्याध्यापक व शिक्षक वर्ग यांचे विशेष मार्गदर्शन व सहकार्य लाभले. शाळेतील या सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे जे.एन.पी. टी.प्रशासन, संस्थेचे पदाधिकारी , जे.एन.पी.टी.विश्वस्त भूषण पाटील,कामगार नेते संदीप पाटील , सामजिक कार्यकर्ते संतोष पवार, प्राथमिक व माध्यमिक विभागाचे मुख्यद्यापक ,पर्यवेक्षक ,शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी,पालक या सर्वांकडून विशेष कौतुक केले व पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.