मुख्यमंत्री रोजगार निमिती योजनेतून बेरोजगारांना स्वय रोजगाराची संधी या योजनेचे उद्घाटन
सिटी बेल | उरण | घनश्याम कडू |
मुख्यमंत्री रोजगार निमिती योजनेतून बेरोजगारांना स्वय रोजगाराची संधी या योजनेचा उद्घाटन जिल्हाप्रमुख माजी आमदार मनोहरशेठ भोईर, रायगड उपजिल्हा संघटक परेशशेठ पाटील व पनवेल तालुका प्रमुख रघुनाथशेठ पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
कोरोना महामारीच्या परिस्थितीत सर्वसामान्य नागरिकांना स्वयंरोजगार उपलब्ध करून देत आर्थिक दृष्टीने बळकट करण्यासाठी ही योजना महाराष्ट्र शासन राबवित आहे.
सदर कार्यक्रमात मार्गदर्शन करतांना माजी आमदार तथा जिल्हा प्रमुख मनोहरशेठ भोईर म्हणाले की स्थानिक बेरोजगार तरुण मुलांनी रोजगार करावा तसेच स्वतःचा व्यवसाय सुरू करून आपला विकास करून घ्यावा, कोरोनामुळे अनेक लोकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. ज्या तरुण मुलांना खरोखर व्यवसाय करायचा आहे त्यांनी या योजनेच्या माध्यमातून फायदा करून घ्यावा असे त्यांनी आपल्या मनोगतातून विचार मांडले. तसेच उरण विधानसभा मतदारसंघात पनवेल तालुक्यातील अजीवली येथे 30 जानेवारी ते 10 फेब्रुवारी 2022 रोजी ही योजना राबविण्यात येणार आहे तरी सर्वांनी त्याचा लाभ घ्यावा असे त्यांनी अहवान केले.

या कार्यक्रमासाठी उपजिल्हा संघटक परेशशेठ पाटील, पनवेल तालुका प्रमुख रघुनाथशेठ पाटील, पनवेल ता संपर्क प्रमुख अनंता पाटील, उपतालुकाप्रमुख जगदीश मते, विष्णू लहाने, डॉ. भरत घरत, विभाग संपर्कप्रमुख अशोक थोरवे, उपतालुका संघटक सुधीर पाटील, विभागप्रमुख चंद्रकात टाकले, नितीन पाटील, मारुती शेठ, किशोर पाटील, अशोक ठाकूर, महेंद्र गायकर, प्रताप हातामोडे, प्रमोद पाटील शिवसैनिक, कार्यकर्ते, शाखाप्रमुख, उपशाखाप्रमुख शिवसेना, युवासेना पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.








Be First to Comment