Press "Enter" to skip to content

गुळसुंदे विद्यालयातील माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा

रसायनीतील हरविलेली पाखरे सोशल मिडीयाच्या माध्यमातून तीस वर्षांनंतर एकत्र

सिटी बेल | रसायनी | राकेश खराडे |

गुळसुंदे रसायनी येथील स्वामी विवेकानंद तुंगारतन विद्यालयातील सन 1991-92 या दहावीच्या वर्गात शिक्षण घेणाऱ्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा तीस वर्षांनंतर मोठ्या उत्साहात करण्यात आला.रसायनी परिसरातील हि हरवलेली पाखरे तब्बल तीस वर्षांनंतर सोशल मिडीयाच्या माध्यमातून एकत्र आली.

आपल्या वर्गंमित्रांना एकत्रित आणण्याचे काम देवळोली येथील सामाजिक कार्यकर्ते धनाजी पाटील यांनी केले.धनाजी पाटील यांनी गुळसुंदे तुंगारतन विद्यालयात सन 1991-92 या वर्षात दहावीच्या वर्गात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे मोबाईल नंबर जमवाजमव करून त्यांचा व्हाट्सअप ग्रुप तयार केला.व तीस वर्षांनंतर एकत्रित आणण्यासाठी सावळे देवळोली येथील उसरण धरण येथील निसर्गरम्य परिसरात स्नेहमेळावा आयोजित केला.

यावेळी तीस वर्षांनंतर एकत्र आलेल्या माजी विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन गप्पा गोष्टी करत चर्चेत सहभागी झाले.आपल्या तीस वर्षांतील काही माहिती एकमेकांना सांगितली.यानंतर माजी विद्यार्थ्यांनी वालाच्या शेंगांच्या पोपटीचा आस्वाद घेवून भोजनाचा कार्यक्रम झाला.यापुढे आपल्या ग्रुप मधील कोणावरही काही संकट आले तर सुखदुःखात त्याच्या सर्वांनी सामील व्हायचे असे ठरले.

यावेळी स्नेहमेळावा कार्यक्रमात जिल्हा परिषद महिला व बालकल्याण माजी सभापती प्रियाताई मुकादम सहभागी झाल्या होत्या.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.