आपटा ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी मयुर शेलार
सिटी बेल | रसायनी | राकेश खराडे |
रसायनी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील आपटा या ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी असणारे वृषभ धुमाळ यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर उपसरपंच पद रिक्त झाले होते.या उपसरपंच पदाची निवडणूक आपटा ग्रामपंचायतीच्या कार्यालयात पार पडली.
यावेळी उपसरपंच पदासाठी शेकापचे मयुर शेलार यांनी अर्जं दाखल केला होता.यावेळी निवडणूक अधिकारी म्हणून ग्रामसेवक नवनाथ शेंडगे यांनी काम पाहिले.तर उपसरपंचपदाची निवडणूक सरपंच निकीता दर्शंन भोईर यांच्या उपस्थितीत पार पडली.उपसरपंचपदी मयुर शेलार यांची निवड होताच कार्यालयाबाहेर मयुर शेलार यांच्या चाहत्यांनी आनंदोत्सव साजरा केला.
यावेळी महाविकास आघाडीच्या मान्यवरांनी उपस्थित राहून नवनिर्वाचित उपसरपंच मयुर शेलार यांना शुभेच्छा दिल्या.
दरम्यान आपटा ग्रामपंचायतीच्या सरपंच निकीता भोईर यांनीही राजीनामा दिल्याचे विश्वसनीय वृत्त आहे.








Be First to Comment