सिटी बेल | रसायनी | राकेश खराडे |
वासांबे मोहोपाडा ग्रामपंचायत हद्दीतील मोहोपाडा येथील रामचंद्र मुंडे ते ओक या रस्त्याची दुरवस्था झाल्याने या रस्त्यावरून प्रवास करताना नागरिकांना विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे.हा रस्ता व्हावा अशी नागरिकांनी मागणी केली होती.या मागणीला अनुसरून सरपंच ताई पुंडलिक पवार यांनी प्रयत्न केले.
वासांबे मोहोपाडा ग्रामपंचायतीच्या सरपंच ताईं पुंडलिक पवार यांनी विकासकामांकडे अधिक लक्ष दिले असून निवडून आल्यानंतर परिसरातील प्रलंबित विकासकामे करण्याकडे सरपंच ताई पवार यांनी लक्ष घालून गेल्या तीन वर्षांत परिसराचा कायापालट करण्यासाठी महत्वाची भूमिका बजावली आहे.

मोहोपाडा येथील रामचंद्र मुंडे ते ओक या रस्त्यात खड्डे पडल्याने या रस्त्यावरून प्रवास करताना नागरिकांना विशेषत विद्यार्थ्यांना तारेवरची कसरत करावी लागत होती.हि समस्या सरपंच ताई पुंडलिक पवार यांनी लक्षात घेऊन ग्रामनिधी सेस फंडातून रस्त्याला पेव्हर ब्लॉक बसवून सदर रस्त्याचे काम पूर्ण केले असून या रस्त्यावरून आता नागरिकांना प्रवास करणे सुखकर झाले आहे.








Be First to Comment