Press "Enter" to skip to content

मुख्यधिकारी पंकज भुसे यांच्या हस्ते ध्वजारोहण

मुरुड मध्ये जंजिरा मुक्ती संग्राम दिन उत्सहात साजरा

सिटी बेल | मुरूड जंजीरा | अमूलकुमार जैन |

रायगड प्रेस क्लब व मुरुड तालुका पत्रकार संघाच्या वतीने ३१ जानेवारी हा दिवस जंजिरा मुक्ती संग्राम दिन म्हणून उत्सहात साजरा करण्यात आला.रायगड प्रेस क्लबचे संस्थापक ज्येष्ठ पत्रकार एस एम देशमुख यांच्या संकल्पनेतून गेल्या अनेक वर्षांपासून मुरुड तालुका पत्रकार संघ व प्रेस क्लब यांच्या विद्यमाने जंजिरा मुक्ती संग्राम दिन साजरा केला जातो.

आज सकाळीच आझाद चौकात ध्वजा रोहण करण्यासाठी मुरुड शहरातील असंख्य नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.आझाद चौकात सकाळी ८. १५ वाजता मुरुड नगरपरिषदेचे प्रशासक व मुख्याधिकारी पंकज भुसे यांच्या शुभ हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.यावेळी पोलीस निरीक्षक नितीन गवारे,नायब तहसीलदार गोविंद कौटुंबे,माजी तहसीलदार नयन कर्णिक,नगरसेवक प्रमोद भायदे,योगिता ठाकूर,राष्ट्रपती पुरस्कार विजेते अजित कारभारी,प्रवासी संघटनेचे अध्यक्ष श्रीकांत सुर्वे,सुनील शेळके,एकदरा सरपंच रामकृष्ण आगरकर,रायगड जिल्हा प्रेस क्लब चे अध्यक्ष भारत रांजणकर,मुरुड तालुका पत्रकार संघाचे उपाध्यक्ष सिराज शेख,सचिव सुधीर नाझरे,खजिनदार गणेश चोडणेकर, सहसचिव नितीन शेडगे,प्रकाश सादरे,माजी अध्यक्ष मेघराज जाधव,पाणी पुरवठा सभापती पांडुरंग आरेकर आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी ध्वजारोहण झाल्यावर माजी अध्यक्ष मेघराज जाधव यांनी जंजिरा मुक्ती संग्राम विषयी माहिती सांगताना सांगितले कि, १५ ऑगस्ट १९४७ ला स्वांतत्र्य मिळाल्यानंतर तब्ब्ल साडेपाच महिन्यानंतर जंजिऱ्याच्या नवाबाने भारत सरकारच्या शामिल नाम्यावर स्वाक्षरी केल्याने खऱ्या अर्थाने मुरुड श्रीवर्धन व म्हसळा हे तीन तालुके भारतात शामिल झाले होते.भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतरही हे तीन तालुक्याचा कारभार जंजिऱ्याचे नवाब चालवत होते.स्वांतत्र्य मिळाल्यानंतर हि नावाबचे अधिपत्य नसावे यासाठी स्वतन्रय चळवळ निर्माण झाली.संपूर्ण भारतात ५२४ संस्थाने होती.तत्कालीन गृहमंत्री सरदार वालभभाई पटेल यांनी सर्व संस्थानिक याना भारतात शामिल होण्याचे एक प्रपत्रक काढले.त्या अनुषंगाने जंजिऱ्याचे नवाब यांनी ३१ जानेवारी १९४८ रोजी शामिल नाम्यावर सही केली तेव्हा खऱ्या अर्थाने हे तीन तालुके भारतात शामिल झाले होते.

रायगड प्रेस क्लब व मुरुड तालुका पत्रकार संघाची इच्छा आहे कि, ज्या प्रमाणे मराठवाडा स्वातंत्र्य दिन साजरा होतो त्याच धर्तीवर सुद्धा जंजिरा मुक्ती संग्राम दिन साजरा व्हावा शासनाचे लक्ष वेधण्यासाठी पत्रकारांकडून हा संग्राम दिन साजरा करत असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले.शासन स्तरावर आमचे प्रयत्न सुरु असून आमचा पाठपुरावा सुरूच राहणार असल्याचे जाधव यांनी यावेळी सांगितले.

यावेळी उपस्थितांचे आभार माजी अध्यक्ष संजय करडे यांनी व्यक्त केले.
सदरील ध्वजारोहनसाठी मुरुड शहरातील असंख्य नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.