नागाव म्हातवली येथील साई दर्शन सोसायटीमध्ये महिलांसाठी हळदी कुंकू कार्यक्रमाचे आयोजन
सिटी बेल | उरण | विठ्ठल ममताबादे |
नागाव म्हातवली येथील साई दर्शन सोसायटीमध्ये प्रथमच शिवसेनेचे म्हातवली ग्रामपंचायत सदस्य चेतन नावलगी, जगदीश म्हात्रे,संगीता म्हात्रे व एस. के .पुरो – पश्चिम विभाग प्रमुख शिवसेना यांच्या पुढाकाराने महिलांसाठी हळदी कुंकू कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
महिलांना प्रोत्साहित करण्यासाठी विविध क्षेत्रातील महिला मार्गदर्शिकांची उपस्थिती यावेळी होती.रायगड उपजिल्हा प्रमुख शिवसेना नरेश रहाळकर,जिल्हा परिषद सदस्य विजय भोईर कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.महिला बचत गटांना महिला सक्षमीकरणाचे गुणमंत्र देऊन महिलांना प्रेरित करीत माजी आमदार मनोहरशेठ भोईर यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत असलेले जिल्हा परिषद सदस्य विजय भोईर यांनी स्वखर्चातून 50 खुर्च्या महिला बचत गटांना देण्याचे वचन देऊन लगेचच ते वचन प्रत्यक्षात आणले. लगेच जागेवरच 50 खुर्च्या विजय भोईर यांनी महिला बचत गटांना उपलब्ध करून दिल्या व महिला चळवळीला, विकासाला बळकटी देण्याचे प्रयत्न केले.
यावेळी डॉ पल्लवी भिरूड यांनी उपस्थितांना आरोग्य विषयक तर नगरसेविका ऍडव्होकेट वर्षा पाठारे यांनी महिलांना कायदे व सुरक्षा विषयक मार्गदर्शन केले.महिला सामाजिक कार्यकर्त्या अर्चना भोईर यांनी दशसूत्री संकल्पना मांडत विविध विषयावर महिलांना मार्गदर्शन केले.शिवसेना महिला संघटक नागाव म्हातवली अनिता घरत, साईदर्शन सोसायटीचे अध्यक्ष नंदन पाटील, सेक्रेटरी -संजय शेंडे यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी सदस्य यावेळी उपस्थित होते. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गीता पवार, स्नेहा हरिमकर तर आभार प्रदर्शन सुनीता नावलगी यांनी केले.








Be First to Comment