Press "Enter" to skip to content

४ वर्षांची मुलगी महामार्गावर फिरत होती एकटीच..

एसटी कर्मचारी अरबाज शिलोस्कर च्या प्रसंगावधानतेमुळे चिमुरडीला मिळाले तिचे माता पिता

सिटी बेल | रायगड़ | धम्मशील सावंत |

रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यातील रामवाडी येथील एस टी महामंडळाच्या विभागीय कार्यशाळेत कामगार म्हणून कार्यरत असणारे अरबाज अजीज शिलोस्कर हे आपली डयूटी संपून घरी जाण्यास येत असताना त्यांना एक ४ वर्षांची अज्ञात मुलगी महामार्गावर एकटी सापडली. काहीशी भेदरलेली व सैरवैर धावणारी ही चिमुरडी अरबाजच्या नजरेत आली.

यावेळी एस.टी चे कर्मचारी अरबाज अजीज शीलोस्कर यांनी समयसूचकता राखत त्या मुलीची विचारपूस केली असता तिला काही बोलता येईना, अशा वेळी अरबाज यांनी रामवाडी गावात जाऊन प्रत्येक घरी मुलीची ओळख पटवून घेण्याचा प्रयत्न करीत असताना एका घरी अज्ञात मुलीचे वडील सापडले व ती व्यक्तीच त्या मुलीचे खरे वडील आहेत का याची देखील खात्रीपूर्वक चौकशी अरबाज यांनी त्यांच्या घराच्या शेजारी राहणाऱ्या व्यक्तींकडून करून घेतली. त्यानंतरच अरबाज यांनी त्या लहान मुलीला तिच्या आई वडिलांच्या स्वाधीन केले तसेच पालकांना समज देऊन आपल्या पाल्याची काळजी घ्यावयास सांगितले.

अरबाज अजीज शिलोस्कर

सध्या लहान मुलांना पळवणारी टोळी सक्रिय झाली असून बालकांचे होणारे अपहरण, अत्याचाराच्या घटना घडत असल्याचा बातम्या रोज कानी पडत असून समस्त पालकांनी आपल्या पाल्याची काळजी घेऊन सतर्कतेने राहण्याचे आवाहन अरबाज शिलोस्कर यांनी केले आहे.

दरम्यान काही दिवसांपूर्वी पेण तालुक्यात मुले चोरणारी टोळी सक्रिय झाल्याची व्हिडीओ बातमी समाजमाध्यमांवर फिरत होती, अशातच आईवडिलांनी आपल्या मुलांवर लक्ष ठेवावे, मुले कुठे जातात कुठे खेळतात, यावर बारीक लक्ष ठेवावे अन्यथा कोणतीही दुर्घटना घडण्याची शक्यता सुजाण व ज्येष्ठ नागरिक व्यक्त करीत आहेत.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.