Press "Enter" to skip to content

कोप्रोली गावाच्या हद्दीत बेकायदेशीररित्या देशी विदेशी मद्यसाठा हस्तगत

सिटी बेल | पनवेल | वार्ताहर |

पनवेल तालुक्यातील कोप्रोली गावाच्या हद्दीत बेकायदेशीररित्या देशी विदेशी मद्यसाठा करून त्याची विक्री करणार्‍या एका इसमाविरोधात पनवेल तालुका पोलिसांनी गुन्हा दाखल करून त्याच्याकडून हजारो रुपये किंमतीचा मद्यसाठा हस्तगत केला आहे.

कोप्रोली गावाच्या हद्दीत राहणार्‍या किरण पाटील हा बेकायदेशीररित्या देशी-विदेशी मद्यसाठा करून त्याची विक्री करीत असल्याची माहिती वपोनि रवींद्र दौंडकर यांना मिळताच त्यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेच्या पथकाने सदर ठिकाणी छापा टाकून त्या ठिकाणी जवळपास 6 हजार 760 रुपये किंमतीचा देशी विदेशी मद्यसाठा हस्तगत केला आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.