Press "Enter" to skip to content

कर्जत नगरपरिषदेतर्फे वचनपूर्ती सोहळा संपन्न

कर्जत मधील ज्येष्ठ नागरिक संस्थेस मिळाले स्वतःच्या हक्काचे कार्यालय

सिटी बेल | कर्जत | संजय गायकवाड |

कर्जत मधील ज्येष्ठ नागरिक संस्थेस कार्यालय नव्हते, आम्हा ज्येष्ठ नागरिकांना बसण्यासाठी एखादं कार्यालय मिळावे अशी मागणी अनेक वर्षापासून ते नगरपरिषदेकडे करत होते, त्यांना नगरपरिषदेने कार्यालय उपलब्ध करून दिले, कार्यालयाचे हस्तांतर, वचनपूर्ती सोहळा नुकताच संपन्न झाला.

कर्जत नगर परिषद हद्दीतील नानामास्तर नगर मुद्रे तेथे असलेल्या व्यायाम शाळा (जिम ) वर नगरपरिषदेने ज्येष्ठ नागरिक संस्थेचे कार्यालय उपलब्ध करून दिले आहे. हे कार्यालयाच्या वचनपूर्ती सोहळ्याचा व हस्तांतराचा समारंभ नगराध्यक्ष सुवर्णा जोशी यांच्या हस्ते संपन्न झाला.

यावेळी नगर परिषदेचे मुख्याधिकारी डॉ.पंकज पाटील, नगरसेविका भारती पालकर, संचिता पाटील, वैशाली मोरे, प्राची डेरवणकर, नगरसेवक राहुल डाळींबकर, ज्येष्ठ नागरिक संस्थेचे अध्यक्ष सुभाषचंद्र नातू, माजी अध्यक्ष मोरेश्वर शहासने, मुकुंद मित्रगोत्री, अच्युत कोडगिरे, प्राजक्ता गरवारे आदींसह ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते.

कर्जत मधील ज्येष्ठ नागरिकांना बसण्यासाठी कार्यालय नव्हते, ज्येष्ठ नागरिक संस्थे तर्फे अनेक वर्ष नगर परिषदेकडे मागणी होत होती, नगराध्यक्ष सुवर्णा जोशी व नगरपरिषद प्रशासनाने आम्हाला कार्यालय उपलब्ध करून दिल्याने आम्हाला हक्काचे कार्यालय मिळाले आहे त्यामधून आम्ही आमच्या संस्थेचे काम करू असे सांगून संस्थने नगरपरिषदेचे आभार मानले आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.