शिवसेना कुसुंबळे विभाग व ग्रामपंचायत कुसुंबळे यांच्या संयुक्त विद्यमाने महिलांच्या एकीचे दर्शन
सिटी बेल | याकुब सय्यद | नागोठणे |
कुसुंबळे ग्रामपंचायतीने आयोजित केलेल्या हळदी-कुंकवाला दीड हजार महिलांनी उपस्थिती लावत महिला एकीचे दर्शन घडविले. प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधत कुसुंबळे ग्रामपंचायत कार्यालयासमोर हळदी-कुंकु कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी जिल्हा महिला कॉंग्रेसच्या अध्यक्षा ॲड. श्रद्धा ठाकूर, पनवेलच्या नगरसेविका राजेश्री वावेकर या प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थिती होत्या.
ग्रामपंचायतीच्या उपसरपंच रसिका केणी यांच्या संकल्पनेतून या हळदी-कुंकू समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. ग्रामपंचायतीच्या सरपंच मिना लोभी, शिवसेनेच्या महिला पोयनाड विभाग प्रमुख रेश्मा जोशी, ग्रामपंचायतीच्या सरपंच जागृती पाटील, प्रतिभा वाघ, अर्चना पाटील यांच्यासह महिला बचत गटाच्या सदस्या, ग्रामपंचायत हद्दीतील महिला यावेळी मोठ्याप्रमाणात उपस्थित होत्या. दीड हजारहुन अधिक महिलांनी हळदी-कुंकु समारंभात हजेरी लावत ग्रामपंचायतीकडून सुरु असलेल्या महिला सक्षमीकरण उपक्रमात सहभाग घेतला. कुसुंबळे ग्रामपंचायतीकडून महिलांना सक्षम करण्यासाठी अनेक उपक्रमांचे सातत्याने आयोजन केले जाते. यास येथील महिलांकडून चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे हळदी-कुंकु समारंभानिमित्ताने दिसून आले.

पारंपरिक सणांना आधुनिकतेची झालर चढली असली तरी, कुसुंबळे परिसरातील महिलांनी आपली लोकसंस्कृती जपत पारंपारिक पोषाखात येऊन वाण स्वीकारला. कुसुंबळे परिसरातील महिला स्वतःच्या समस्या सोडविण्यात सक्षम असून त्यांच्यात एकी निर्माण करण्याचे काम ग्रामपंचायतीच्या उपसरपंच रसिका केणी यांनी केल्याचे म्हणत पनवेल पालिकेच्या नगरसेविका राजेश्री वावेकर यांनी सर्व महिलांचे कौतुक केले.
महिला बचतगटाच्या माध्यमातून महिलांना सक्षम करण्यासाठी ग्रामपंचायतीने विविध उपक्रम राबविलेले आहेत. कोरोना कालावधीत महिलांनी घेतलेल्या पुढाकारामुळे या परिसरात कोरोनाचा फारसा परिणाम दिसून आला नाही. घर आणि समाज संभाळण्यात महिला सक्षम असल्याचे कुसुंबळे ग्रामपंचायत हद्दीतील महिलांनी दाखवून दिल्याची प्रतिक्रीया प्रमुख पाहुण जिल्हा महिला कॉग्रेस प्रमुख ॲड. श्रद्धा ठाकूर यांनी व्यक्त केली. या हळदी-कुंकु कार्यक्रमानिमित्ताने दीड हजारहुन अधिक महिला उपस्थित होत्या.








Be First to Comment