Press "Enter" to skip to content

समुद्र किनारी ड्रोन उडविणे पडले महागात

विहुर रौदं येथे ड्रोन कमेराद्वारे शूटिंग करणाऱ्या चौघांविरोधात गुन्हा दाखल

सिटी बेल | अलिबाग | अमूलकुमार जैन |

मुरुड तालुक्यातील विहुर ग्राम पंचायत हद्दीतील रौदं खेळाचे नामक मैदानावर जिल्हा अधिकारी यांची समुद्र किनारी ड्रोन उडविण्यास बंदी असतांना देखील दिनांक 30 जानेवारी 2022 रोजी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास ड्रोन कमेराद्वारे शूटिंग करणाऱ्या चौघांविरोधात मुरुड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत मुरुड पोलीस ठाण्यात तक्रार पोलीस नाईक परेश मुरलीधर म्हात्रे यांनी दिली आहे.

याबाबत ची सविस्तर माहिती अशी की, मुरुड मजगाव दरम्यान असणाऱ्या विहुर ग्राम पंचायत हद्दीतील हद्दीतील रौदं खेळाचे नामक मैदानावर दिनांक 30 जानेवारी2022 रोजी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास जिल्हा अधिकारी यांची समुद्र किनारी ड्रोन उडविण्यास बंदी असतांना देखील सरफराज मोहमद सईद सय्यद (वय४० वर्षे,राहणार- मौजे नागोठणेटक्का मोहहला, तालुका- रोहा,जिल्हा-रायगड ) व अल्लादिन फैयाज मोबिन(वय२३वर्षे,राहणार-बेलसे, ता-पेण, जि-रायगड) यांनी राहील अब्दुल करीम कडू (वय३९ वर्षे,राहणार-शिघ्रे, ता-मुरुड, जि-रायगड) इक्रार अ.समद मोदी ( वय४४ वर्षे,राहणार-विहुर, ता-मुरुड,जि-रायगड) यांच्या सांगण्यावरून स्थानिक प्रशासनातील ड्रोन कॅमेरा उडविणे व शूटिंग करणे बाबत कोणत्याही प्रकारची परवानगी न घेता बेकायदेशीर रित्या ड्रोन कमेराद्वारे शूटिंग करताना मिळून आले.

याबाबत मुरुड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलीस निरीक्षक नितीन गवारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक वाघमारे हे करीत आहेत.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.