सिटी बेल | उरण | विठ्ठल ममताबादे |
उरण तालुक्यातील केगांव ग्रामपंचायत हद्दीत अनेक विविध समस्या आहेत. त्या वेळेत सुटत नसल्याने व त्या समस्या वर्षानुवर्षे तसेच राहत असल्याने या विविध समस्या विषयी केगाव ग्रामस्थांनी आवाज उठवीला आहे. डम्पिंग ग्राउंड, स्म्शान भूमी शेजारी असलेले कचऱ्याचे साम्राज्य व पसरलेली दुर्गंधी, समुद्रकिनारी बेकायदेशीर अनधिकृत वसलेले दुकाने, टपरी, ढाबे, समुद्रकिनारी शासकीय जागेत झालेले अतिक्रमण, अस्वच्छ सार्वजनिक शौचालय,15 ते 20 दिवसातून एकदा पाणीपुरवठा, पाईपलाईन फुटलेले असणे, ग्रामसभा न होणे, ग्रामस्थांच्या मागण्या विचारात न घेणे आदी समस्या बाबत केगाव ग्रामपंचायत कोणतेही त्वरित कार्यवाही करीत नसल्याने केगाव ग्रामस्थ केगाव ग्रामपंचायतीच्या कारभाराबाबत नाराज आहेत.
दि 26/1/2022 रोजी ग्रामस्थांनी सरपंच, उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्य यांना समस्येची पाहणी करण्यासाठी बोलविले होते मात्र सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य पाहणी करण्यास उपस्थित नव्हते.मात्र केगाव ग्रामस्थ व ग्रामसेवक वैभव पाटील यांनी सदर समस्यांची पाहणी केली. वेगवेगळ्या समस्या ग्रामस्थांनी त्यांच्या निदर्शनास आणून दिले. या सर्व समस्या सोडविण्याचे आश्वासन ग्रामसेवक वैभव पाटील यांनी ग्रामस्थांना दिला.
सरपंच, उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्य हे समस्या पाहण्यासाठी उपस्थित नव्हते. सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य या सर्व समस्यांकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. सरपंच, उपसरपंच व ग्रामपंचायतच्या सदस्यांना या समस्या सोडविण्यासाठी वेळच नसल्याचे सांगत ग्रामस्थांनी या ग्रामपंचायती विरोधात आवाज उठवीला आहे.यावेळी समाज सेवक आतिष केसरीनाथ हुजरे,अक्षय अशोक पाटील,प्रवीण जयहिंद पाटील,विनेश जनार्दन पाटील,अरविंद पवार,विनोद केशव पाटील,हर्षद द्वारकानाथ ठाकूर, कुंजन गजानन ठाकूर, अंकित प्रवीण म्हात्रे, अविनाश क. पाटील,कल्पेश पाटील,रोशन पाटील,मृणाल पाटील, दीपेश कनोजिया, सत्येन्द्र हिराजी ठाकूर,रमेश ठाकूर,अरुण ठाकूर व मोठ्या प्रमाणात केगाव रहिवासी उपस्थित होते.








Be First to Comment