Press "Enter" to skip to content

उरण डाॅक्टर्स असोसीएशनच्या अध्यक्षपदी डाॅ.प्रिती संतोष गाढे

संघटनेच्या इतिहासात प्रथमच सर्व पदांवर महिलांची निवड

सिटी बेल लाईव्ह /सुनिल ठाकुर /उरण #

डाॕक्टर अशोशीएशन ही उरण तालुक्यातील सामाजिक कार्य करणारी व बांधिलकी जपणारी अग्रगण्य संघटना आहे. सामाजिक मूल्यांची जाण ठेवून मूल्य जपण्यासाठी समाजातील गरीब व गरजू लोकांना वैद्यकीय मदत मिळविण्यासाठी सदैव तत्पर असते. त्यांच्यासाठी वेगवेगळे कॕम्प आयोजित करून सामाजिक सेवा केली जाते.सामाजिक सेवेचे व्रत घेऊन नावारूपास आलेली व आपल्या कर्तृत्वाने समाजात वेगळा ठसा उमटवणारी ही संघटना आजआपले कार्य निस्वार्थपणे करत आहे .
नुकत्याच सन २०२०-२१ करिता उरण डाॕक्टर्स असोसिएशनच्या अध्यक्षपदी डाॕ प्रिती संतोष गाढे यांची निवड झाली असून डाॕ.पल्लवी पंकज पाटील (सचिव ) डाॕ.भक्ती कुंडेलवार (खजिनदार),व डाॕ. अनिता कोळी (सांस्कृतिक सचिव)पदी निवड झाली आहे , संघटनेच्या इतिहासात प्रथमच सर्व पदांवर महिलांची निवड झाली.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.