Press "Enter" to skip to content

हळदीकुंकू समारंभ उत्साहात साजरा

आदिवासी, विधवा महिलांसाठी उरण मध्ये हळदीकुंकू समारंभाचे आयोजन

सिटी बेल | उरण | विठ्ठल ममताबादे |

आदिवासी, विधवा महिलांसाठी उरण मध्ये हळदीकुंकू समारंभाचे आयोजन करण्यात आले.शुक्रवार 28 जानेवारी रोजी दु 3 ते 5 यावेळेत उरण एसटी डेपो शेजारी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.

शेतकरी कामगार पक्षाचे निष्ठावंत जेष्ठ नेते मोरेश्वर भोईर यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.या कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान शेतकरी कामगार पक्षाच्या अध्यक्षा सीमा घरत यांनी स्विकारले होते.

प्रमुख पाहुणे माजी उपनगराध्यक्ष नाहिदा ठाकूर,तसेच शेकाप शहर अध्यक्षा नयना पाटील,आणि वुमन क्लब च्या अध्यक्षा नयना ठाकूर,मालीनीताई भोईर, माजी उपसरपंच प्रदिप कोळी,कोटगावचे अध्यक्ष माणिक भा.पाटिल उपस्थित होते.भालचंद्र म्हात्रे गुरूजी यांनी सुत्र संचालन केले.

गणपतीची आरती गाणे एका मुस्लिम बांधवने गायले.या अनोख्या हळदीकुंकू समारंभ मधे 75 महिला सहभागी झाल्या होत्या. त्यांना वाण देतांना साडीवाटप करण्यात आले.सीमा घरत यानी आपल्या भाषणात महिलांसोबत हसत खेळत चर्चा करत समाजातील काहि रूढी परंपरा मधे बदल करता आले पाहिजे कारण महिला हि अनंत काळची माता असते. तिचा सन्मान करणे म्हणजे समाजाचा सन्मान करणे होय असे सीमा घरत यांनी सांगितले .नाहिदा ठाकूर,नयना ठाकूर यांनीहि महिलांना मोलाचं मार्गदर्शन केले.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.