सिटी बेल लाइव्ह / गोवे-कोलाड (विश्वास निकम )
रोहा तालुक्यातील गोवे गावचे रहिवाशी चंद्रकांत तुकाराम जाधव आकस्मित दुःखद निधन झाले. मृत्यू समयी त्यांचे वय ५५ वर्षाचे होते.ते परोपकरी व अतिशय मायाळू स्वभावाने ते सर्वाना परिचित होते.त्यांनी शेती व दुधाचा व्यवसाय करुन आपल्या कुटुंबाचा उदर्निवाह केला.परंतु त्यांच्या अचानक जाण्याने त्याच्या कुटूंबावर दुःखाचे डोंगर लोटला आहे.
त्यांच्या वर गोवे येथील वैकुंठ धाम येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.गोवे गावातील सामाजिक कार्यकर्ते मनोहर मांजरे यांनी गावाच्या वतीने त्यांना श्रद्धांजली वाहिली.त्यांच्या पश्चात त्यांची पत्नी,दोन मुलगे,एक मुलगी,बहीण,भाऊ,भावजय,पुतणे चुलत्या व मोठा जाधव परिवार आहे.त्यांचे दशक्रिया विधी गुरुवार दि.६ ऑगस्ट व उत्तरकार्य (तेरावे )विधी रविवार दि.९ऑगस्ट २०२० रोजी त्यांच्या राहत्या निवास्थानी होणार आहेत.






Be First to Comment