सिटी बेल लाइव्ह / पनवेल #
पनवेल नगरपरिषदेचे माजी नगरसेवक भगवान धर्मा पाटील (वय 70) यांचे करोनने दु:खद निधन झाले.
पनवेल नगरपरिषदचे १९८५ ते १९९० या कार्यकारणीत नगरसेवक पद भूषविले होते. तसेच त्यांनी त्यांच्या काळात बांधकाम सभापती पदाचे काम देखील पाहीले आहे.
पनवेल कोळी समाजामध्ये त्यांनी सुरूवातीला ‘कोळेश्वर कोळी युवक मंडळा’ ची स्थापना केली होती. त्यातून त्यांनी समाजाचा पहीला गौरा गणपती उत्सव साजरा करून सर्वजनिक गणेश उत्सवाची सुरूवात केली होती. सुरूवाती च्या काळात कार्ला, वज्रेश्वरी येथे पालखी यात्रेसाठी लागण्या-या व्यवस्थापनाचे महत्वाचे काम तेच पाहायचे.
जेष्ठ समाज सेवक तथा गेल्या अनेक दशकांपासून कोळीवाडा पंच कमिटीचे सल्लागार म्हणुन ते कार्यरत होते. तसेच सातगाव कोळीसमाजाचे अध्यक्ष म्हणून त्यांनी पद भूषविले होते.
समाजातील गरजू नागरिकांना त्वरीत कर्ज उपलब्ध व्हावा म्हणुन त्यांनी ‘एकविरा नागरी सहकारी पतपेढी’ ची स्थापना केली होती व ती पतपेढी आज कार्यरत आहे. त्यांच्या निधनाने पनवेल शहरात हळहळ व्यक्त होत आहे.
त्यांच्या पश्चात त्यांना पत्नी, दोन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे.






Be First to Comment