सिटी बेल | श्रीवर्धन | केतन माळवदे |
गोखले एज्युकेशन सोसायटीचे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, श्रीवर्धन येथे ‘राष्ट्रीय मतदार दिन’ साजरा करण्यात आला. या वेळी सामुहिक प्रतिज्ञा व शपथ घेण्यात आली, तसेच या वेळी निबंध स्पर्धा, पोस्टर स्पर्धा, काव्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धाना मोठा प्रतिसाद मिळाला. या स्पर्धेमध्ये ३६ विद्यार्थी सहभागी झाले होते.

या प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य, डाॅ श्रीनिवास जोशी, एन. एस. एस. कार्यक्रम अधिकारी, प्रा. श्री. किशोर लहारे, प्रा. श्री. वाल्मिक जोंधळे, सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी एन एस एस स्वयंसेवक सहभागी झाले होते, हा कार्यक्रम राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या व रायगड जिल्हा अधिकारी व शासनाच्या परिपत्रका नुसार साजरा करण्यात आला.








Be First to Comment