रंगीबेरंगी राख्या ठरतायत बच्चे कंपनी मध्ये आकर्षक
सिटी बेल लाइव्ह / कोलाड ( कल्पेश पवार )
यावर्षी सर्वच सणावर कोरोनाचे सावट असले तरी भाऊ-बहिणीच्या प्रवित्र बंधनाचा रक्षाबंधन सण हा अवघ्या तीन दिवसांवर येऊन ठेपला असून,त्यानिमित्ताने कोलाड -मधील बाजार पेठ विविध राख्यानी सजली असून रंगीबेरंगी राख्या या बच्चे कंपनीत आकर्षक ठरत आहेत. नारळी पौर्णिमा म्हणजेच रक्षाबंधन हा सण सोमवार दि.०३ ऑगस्ट रोजी असून,या दिवशी प्रत्येक बहीण आपल्या प्रिय लाडक्या भाऊ ला राखी बांधण्याची परंपरा महाराष्ट्रात आहे.त्या निमित्तानेच कोलाड मध्ये विविध ठिकाणी राख्या विक्रीसाठी उपलब्ध आहेत.
या वर्षी रत्ने,खडे,फुल साखळी,गोंडा, चैन,कुंदन अशा प्रकारच्या राख्या उपलब्ध असून या पैकी रंगीबेरंगी बाहुबली,कार्टून,डोरेमोर या सारख्या राख्या लहान मुलींमध्ये आकर्षक ठरत आहेत. तर चैन ,साखळी, ब्रेसलेट तसेच विविध रंगीबेरंगी राख्या या तरुणाई मध्ये आकर्षक ठरत आहेत.या राख्या अगदी ०५ रुपया पासून १५० रुपयांपर्यंत उपलब्ध आहेत.
या रक्षाबंधनाची तयारी बहिणीने आगोदर पासूनच केली असून महिला या आपा आपल्या आवडी प्रमाणे यावर्षी सोशल डिस्टस्टिंगचे नियम पाळून,तोंडावर मास वापरून कोरोनाची भीती बाळगत राख्या खरेदी करीत आहेत.






Be First to Comment