जिल्हाध्यक्ष महेंद्रशेठ घरत यांच्या हस्ते ई – श्रम केंद्राचे उद्घाटन
सिटी बेल | रसायनी |
देशातील असंघटीत कामगारांना संघटीत कामगारांप्रमाणे नोंदणी करून सामाजिक सुरक्षा व कल्याणकारी योजनांचा लाभ मिळावा यासाठी सरकारने ई – श्रम नोंदणी अभियान सुरु केले आहे. रसायनी विभागीय कॉंग्रेस कमिटीने रिस कांबा येथे ई – श्रम महानोंदणी अभियान केंद्र सुरु केले आहे. या ई – श्रम केंद्राचे उद्घाटन २६ जानेवारी २०२२ रोजी रायगड कॉंग्रेस जिल्हाध्यक्ष तथा कामगार नेते महेंद्रशेठ घरत यांच्या शुभहस्ते करण्यात आले.

फळ, भाजी, हातगाडी, सलून, पेंटर, प्लंबर, रिक्षाचालक, टॅक्सीचालक, लोहार, बांधकाम कामगार, वीटभट्टी कामगार यांना ई – श्रम योजनेचा लाभ घेता येईल. हे ई – श्रम कार्ड प्राप्त करण्यासाठी आधारकार्ड, मोबाईल नंबर व बँक पासबुकची आवश्यकता आहे. माजी सरपंच श्री. कृष्णाशेठ पारंगे व माजी खालापूरच्या पंचायत समिती सभापती सौ. कांचन पारंगे यांच्या प्रयत्नाने हे ई – श्रम केंद्र सुरु करण्यात आले. जास्तीत जास्त असंघटीत कामगारांनी याचा फायदा घ्यावा असे आवाहन महेंद्रशेठ घरत यांनी यावेळी केले.

या केंद्राच्या उद्घाटनाप्रसंगी खालापूर ता. पं. स. माजी सभापती सौ. कांचन पारंगे, माजी सरपंच कृष्णाशेठ पारंगे, खालापूर ता. कॉंग्रेस अध्यक्ष नाना म्हात्रे, महाराष्ट्र प्रदेश युवक कॉंग्रेस सचिव निखील डवळे, NSUI रायगड जिल्हा अध्यक्ष, कुणाल जाधव, सौ. वृषाली पाटील (सभापती पं. स. खालापूर) सौ. ताई पवार (सरपंच वासांबे), सौ. श्वेता कांबळे (उपसरपंच वासंबे), सौ. राजश्री जांभळे (उपसरपंच चांभार्ली), सौ. दिपाली म्हात्रे (उपाध्यक्षा रायगड महिला कॉंग्रेस), सौ. सुप्रिया गायकर, प्रतिप पाटील, देविदास म्हात्रे, संतोष चौधरी, अनंत दळवी, प्रमोद राहिलकर, श्याम म्हसकर, अशोक पारंगे, पंढरीनाथ पाटील, पांडुरंग कुरुंगळे, श्रीकांत चौधरी, अक्षय मुंढे, सागर सुखदरे, नितीन पारंगे, दिवेश पाटील, संजय कांबळे, धनाजी जांभळे, प्रविण पारंगे, विवेक भोईर, सौ. माधुरी कांबळे, (ग्रा. प. सदय वासंबे), भगवान जांभळे, प्रशांत खाने, शयान उस्मानी, वैभव मांडे, बंटी डवळे, विनायक डवळे, भूषण म्हात्रे, बाबू वाघमारे, हरिश्चंद्र पारींगे, विश्वास पारींगे, नामदेव जांभळे, श्रीकांत चौधरी आदि उपस्थित होते.








Be First to Comment