Press "Enter" to skip to content

गोवे येथे ग्रामपंचायत इमारतीचे उद्घाटन

गोवे महिला बचत गटानी तयार केलेल्या मसाल्याची चव महारास्ट्रा ने चाखावी – खासदार सुनिल तटकरे 

सिटी बेल | धाटाव | शशीकांत मोरे |

गोवे ग्रामपंच्यतीसह आजुबाजुच्या परिसरातील बुजुर्ग नेते मंडळी यांनी हा परिसर घडवीला त्याच पधतीत तरुण सुधा लक्ष घालीत आहेत गोवे गाव एकसंघ झाला कटुता संपली याचा मनस्वी आनंद माझा सारख्या कार्यक्रत्याला असुन या गावातील जिजाऊ महिला बचत गटानी विविध प्रकारच्या मसाल्याचा उद्योग सुरु केला आहे त्यामुळे माझा माता भगिनिनी तयार केलेल्या या मसाल्याची चव महारास्ट्राने चाखावी ईतकी भरभराट उद्योगा ची व्हावी असे वक्तव्य खासदार सुनिल तटकरे यानी केले 

गोवे येथील ग्रामपंचायत इमारतीचे उद्घाटन व नळ पुरवठा पानी योजनेचे भूमिपूजन  विकास कामाच्या उध्घाटन प्रसंगी ते बोलत होते

व्यासपिठावर आमदार अनिकेत तटकरे, सुरेश दादा महाबळे, रामचंद्र चितळकर, महेंद्र पोटफोडे,  बाबूराव बामने, नारायण धनवी, तानाजी जाधव, प्रकाश थिटे, राम कापसे, नंदा कापसे, प्रीतम पाटिल, नरेंद्र जाधव, वसंत भोईर, संजय माड़लुस्कर, प्रशांत म्हशीलकर, प्रमोद म्हसकर, मनोज शिर्के, दशरथ साळवी, उपसरपंच उत्तम बाईत आदी कार्यकर्ते उपस्थीत होते. 

ज्या महामानवा नी समाजाला दिशा दिली विचार दिले तेच विचार शरद चंद्र्जी पवार साहेब जपत आहेत अणि गोवे गावात देखील महामान यांचा वारसा जपला जात आहे अनेक ठिकाणी नव्या क्रांति नुसार एकिकडे मोठ मोठी जिम्न्याशियम उभी रहात असताना या ठिकाणी तरुण मुलं यांचे आखाडा  लेझिम कवायती पाहिल्या तर जुन्या संस्कृतीचा ठेवा जपण्याचा काम होत आहे 

काल परवा आमदार या परिसरात आले 500 कोटीची कामे केली. एवढा मोठा आकडा ,काम कुठे केली त्यानाच माहिती.  परत ते असे बोलले एका घरात पाच आमदार ,एक खासदार, परंतु ही आमदार खासदार किची पुण्याई जनतेची काम केल्याने .च जनतेने निवडून दिले. केवळ एकदा निवडुन आल्यावर 15 वर्ष तुम्हाला वाट बघावी लागते असा अप्रत्यक्ष टोला रवी पाटील यांना लगावला. 

गोवे ग्राम पंचायती चे उद्याचे भविष्य उज्वल असुन या पंचक्रोशीला कुणाचीही दृस्ट न लागो असे म्हणत महिलां ना रोजगार मिळावा त्यानि पण आपल्या पायावर उभे रहावे या करिता आंबेवाडी येथे बचत गट भवनाची उभारणी करणार असल्याचे तटकरे यानी सांगितले. 

 तर आमच्यावर विश्वास ठेउन ग्राम पंचायत बिन्ंविरोध केलीत तुमची सगळी विकासा ची कामे केली जातिल असा ठाम विश्वास आमदार अनिकेत तटकरे यांनी ग्रामस्थांना दिला. 

तर मुठवली शिरवली गोवे या तिन्ही गावात पानी योजना रुपये 1 कोटी शिरवली गोवा रोड रुपये 4 कोटी 65लाख  महीसदरा बंधिस्ती  1 कोटी  अशी कामे मार्गी लागणर असुन अनेक डझन भर कामे झाली असल्याची यादी सरपंच महेंद्र पोटफोडे यांनी वाचुन दाखवली व तुम्ही करीत असलेल्या विकासा बाबत साहेब ताई भाई यांना धन्यवाद दिले. 

 कार्यक्रम यशस्वी करण्या करिता सरपंच महेंद्र पोटफोडे, नरेंद्र जाधव, उपसरपंच नितीन जाधव, सदस्या सुप्रिया जाधव, रंजिता जाधव, भावना जवके,  भरत कापसे, संदीप जाधव, नरेंद्र पवार, राजा जाधव, नितीन जवके, महेंद्र जाधव, सह ग्रामस्थ मंडळ  महिला मन्डळ तरुण मंडळ  व बचत गट महिला नी अथक म्हेहनत घेतली 

मसाला पाकिटे भेट
साहेबांना जिजाऊ बचत गटाकडून मसाल्याची पाकिटे भेट. साहेब वरदा ताई कडे ही पाकिटे नक्की पाठवा. आणि तुम्ही रुचकर भोजना चा आस्वाद घ्या. गेली अनेक वर्ष जी जबाबदारी घेतली नाही ती अवघड जबाबदारी माझा कडे सोपवलीत असे तटकरे साहेब बोलता च सभेतील लोकाना हसु आवरना से झाले.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.