Press "Enter" to skip to content

माणगाव तालुक्यात शिवसेनेला खिंडार

प्रसाद गुरव, मिलिंद फोंडके यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादीत जाहीर प्रवेश

पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंवर अश्लाघे भाषेत टिका करणाऱ्या भाजपाशी संगनमत करणाऱ्यानी निष्ठा सांगू नये : खा.सुनिल तटकरे यांनी शिवसेनेवर जहरी टीका

सिटी बेल | रायगड़ | धम्मशील सावंत |

राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस महाविकास आघाडी सरकार मध्ये एकत्रित असले तरी रायगड़ जिल्ह्यात शिवसेना व राष्ट्रवादी पक्षात आपापसात मतभेद सुरु आहेत, जिल्ह्यात आपापसात पक्षप्रवेश केले जात असून एकमेकांवर जहरी टिका केली जातेय. सत्तेसाठी नगरपंचायत निवडणुकीत शिवसेनेने भाजपची मद्त घेतली, शिवसेनेने लाजीरवानी गोष्ट केली, पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंवर अश्लाघे भाषेत टिका करणाऱ्या भाजपाशी संगनमत केले, अशा शिवसेनेने आम्हाला निष्ठा शिकवू नये,अशा शब्दात खा.सुनिल तटकरे यांनी शिवसेनेवर जहरी टिका केली.

शिवसेनेचे प्रसाद गुरव, मिलिंद फोंडके यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीत जाहीर प्रवेश केल्याने पक्षसंघटनेला बळकटी मिळणार असल्याचे खा. तटकरे म्हणाले. राष्ट्रवादी काँग्रेस निजामपूर विभाग व सुनिल तटकरे युवा प्रतिष्ठान च्या वतीने रुग्णवाहिका लोकार्पण सोहळा, निजामपुर विभागातील विविध विकासकामांचे भूमिपूजन, तसेच शिवसेनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी पक्षात जाहिर प्रवेश व माणगाव नगरपंचायत मधील नवनिर्वाचित नगरसेवकांचा सत्कार खा. सुनिल तटकरे व आ. अनिकेत तटकरे यांच्या उपस्थितीत करण्यात आला.

यावेळी खासदार सुनिल तटकरे यांनी शिवसेनेवर टिकास्त्र सोडले. यावेळी बाबूशेठ खानविलकर यांची जनहित व विकासासाठी अहोरात्र धडपड सुरू आहे. त्यांनी समाजसेवेला वाहून घेतले आहे, एटीएम प्रमाणे सदैव जनतेची निस्वार्थी व प्रामाणिक सेवा करणारा निष्ठावन्त कार्यकर्ता बाबशेठ खानविलकर च्या रूपाने आम्हाला मिळाला असल्याचे कौतुकोदगार खा. तटकरे यांनी काढले. याबरोबरच निजामपूर माणगाव विभागाला विकासात्मक दृष्टया झुकते माप देणार असून विकासनिधी कमी पडू देणार नाही, अशी ग्वाही खा. सुनिल तटकरे यांनी दिली.

या कार्यक्रमास महाड माणगाव पोलादपूर विधानसभा अध्यक्ष बाबूशेठ खानविलकर, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी निजामपूर विभाग अध्यक्ष संदीपशेठ जाधव, मिलिंद खानविलकर, अलकांताई जाधव, प्रभाकर उभारे, सुभाषशेठ केकाने, इकबालशेठ धनसे, संगिता ताई बक्कम, शेखरशेठ देशमुख, आनंदशेठ यादव आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.