आमदार महेंद्र थोरवे यांच्या नेतृत्वाखाली कर्जत व खालापूर तालुक्यातील विविध पक्षाच्या पदाधिकारी, कार्यकर्ते यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश
या पक्षप्रवेशामुळे भविष्यकाळात पक्ष संघटन मजबूत होणार : आमदार महेंद्र थोरवे
सिटी बेल | कर्जत | संजय गायकवाड |
कर्जत विधानसभेचे आमदार महेंद्र थोरवे यांच्या नेतृत्वाखाली व जिल्हा सल्लागार बबन पाटील यांच्या उपस्थितीत विविध पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला आहे, प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी हा पक्ष प्रवेश झाला आहे.
कर्जत व खालापूर तालुक्यातील राष्ट्रवादी, काँग्रेस, मनसे कार्यकर्त्यांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला.यामध्ये प्रामुख्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माजी जिल्हा परिषद सदस्या पूजा थोरवे, प्रवीण थोरवे, कॉग्रेसचे माजी जिल्हा परिषद सदस्य मनोहर पादिर, तसेच आदिवासी वाड्या वस्त्यांमधील अनेक नागरिकांनी, खालापूर तालुक्यातील महेश आगीवले, रितेश आगीवले व त्यांचे सहकारी तसेच मनसे माजी तालुका अध्यक्ष अंकुश तथा पप्पू शेळके व त्यांचे सहकारी यांनी आज शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला.

या पक्षप्रवेशामुळे मुळे भविष्य काळात पक्ष संघटन मजबूत होणार असल्याचे मत आमदार महेंद्र यांनी या निमित्ताने व्यक्त केले. आपण सर्वांनी आज प्रजासत्ताक दिनी पक्षात प्रवेश केल्यानंतर आपला नेहमी यथोचित सन्मान भविष्यकाळात केला जाईल असे आश्वासन सुद्धा आमदार महेंद्र थोरवे यांनी यावेळी दिले.
या प्रसंगी जिल्हा सल्लागार बबन पाटील, जिल्हा सल्लागार भरत भगत, सहसंपर्क प्रमुख विजय पाटील, उपजिल्हा प्रमुख भाई गायकर, विधानसभा संघटक संतोष भोईर, संपर्क प्रमुख पंकज पाटील, तालुका प्रमुख उत्तम कोळंबे, तालुका संघटक शिवराम बदे, सर्व उपतालुका प्रमुख, विभाग प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.








Be First to Comment