Press "Enter" to skip to content

पेणच्या सार्वजनिक विद्यामंदिर शाळेचा निकाल 99.39 टक्के

सिटी बेल लाइव्ह / पेण (राजेश कांबळे)

माध्यमिक शालान्त परीक्षेत पेण येथील सार्वजनिक विद्यामंदिर व ज्युनियर कॉलेज या महाविद्यालयाचा एकूण निकाल 99.39 टक्के लागला असून 90% च्या वर गुण मिळविणारे एकूण विद्यार्थी 16 आहेत .

या विद्यालायातील प्रथम क्रमांक – निशिगंधा नरेंद्र म्हात्रे हिने ४७२ गुण मिळवून ९४.४० % प्रथम क्रमांक , अमृता किशोर घरात ४६९ गुण , ९३.८० % ,द्वितीय क्रमांक , मंथन यशवंत भोईर ४६४ गुण ९२.८०% तृतीय क्रमांक , प्राची दशरथ गावंडे ४६२ गुण ९२.४०% शाळेत चौथा क्रमांक , अजीम नवीन अन्सारी ४६० गुण ९२.००/पाचवा , पूर्वा भालचंद्र कडू, ४५६ गुण ९१.२० सहावा , साहिल भाई चंदू पाटील,४५४ गुण ९०.८०, सातवा, वैभवी किरण थले ४५१ गुण ९०.२०टक्के मिळवून सार्वजनिक विद्यामंदिर व जुनिअर कॉलेज पेण यामध्ये प्रथम येण्याचा मान मिळवला आहे.

ह्या गुणवंत विद्यार्थ्यांचे सार्वजनिक विद्यामंदिर व ज्युनिअर कॉलेज पेणचे अध्यक्ष पी. डी.पाटील, उपाध्यक्ष केशव नाना पाटील, शाळेचे प्राचार्य एम. व्हि. पाटील, उपप्राचार्य वाघ सर, संचालक प्रमोद पाटील, राजा पाटील यासह संचालक मंडळ शिक्षक व शिक्षकेतर यांनी अभिनंदन केले आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.