Press "Enter" to skip to content

सदानंद गायकवाड यांच्या वाढदिवसानिमित्त

कोकण ज्ञानपीठ उरण महाविद्यालयात रक्तदान शिबीर उत्साहात संपन्न

सिटी बेल | उरण | विठ्ठल ममताबादे |

कोकण ज्ञानपीठ उरण वाणिज्य व कला महाविद्यालय अंतर्गत राष्ट्रीय सेवा योजना विभाग,उरण महाविद्यालय,लायन्स क्लब उरण,मी उरणकर सामाजिक व सांस्कृतिक संस्था उरण, माजी विद्यार्थी संघ, टायगर ग्रुप उरण, श्री छत्रपती शिवाजी महाराज सामाजिक संस्था उरण यांच्या संयुक्त विद्यमाने एमजेएफ लायन सदानंद सखाराम गायकवाड यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून बुधवार दि 26 जानेवारी 2022 रोजी सकाळी 9 ते दुपारी 2 या वेळेत कोकण ज्ञानपीठ उरण वाणिज्य व कला महाविद्यालय,तहसील कार्यालय जवळ,उरण येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

या शिबिरात एकूण 111 रक्तदात्यांनी रक्तदान केले. यावेळी उरण विधानसभा मतदार संघाचे विद्यमान आमदार महेश बालदी, कोकण ज्ञानपीठ उरण महाविद्यालयाचे प्राचार्य बळीराम गायकवाड, माजी प्राचार्य के. ए. शामा,लायन्स क्लब उरण अध्यक्ष लायन नरेंद्र ठाकूर, लायन्स क्लब सचिव नीलिमा नारखेडे,महाविद्यालय विकास समिती सदस्य पी डी पाटील, सदस्य -रमेश ठाकूर,माजी विद्यार्थी संघ अध्यक्ष विशाल पाटेकर, टायगर ग्रुप उरण तालुकाध्यक्ष आकाश जोशी, श्री छत्रपती शिवाजी महाराज सामाजिक संस्थेचे अध्यक्ष सुदेश पाटील,एम जी एम हॉस्पिटल कामोठेचे ब्लड बँक प्रमुख डॉ राजेश आताडे, ब्लड बॅंकचे सर्व कर्मचारी वर्ग,महाविद्यालय विकास समिती, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी तसेच लायन्स क्लब, टायगर ग्रुप, माजी विद्यार्थी संघ, छत्रपती शिवाजी महाराज सामाजिक संस्थेचे पदाधिकारी सदस्य यावेळी उपस्थित होते.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.