सिटी बेल | उरण | विठ्ठल ममताबादे |
श्री समर्थ कृपा सखी स्वयं सहाय्यता संस्था व शिवराज युवा प्रतिष्ठान उरण रायगड यांच्या संयुक्त विद्यमाने पोलीस कर्मचारी व त्यांच्या परिवाराकरिता उरण पोलीस ठाणे, उरण शहर येथे आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. मेडलाईफ फॉउंडेशन तर्फे डॉक्टरांच्या टीमने पोलीस कर्मचाऱ्यांच्या आरोग्याची तपासणी केली. यावेळी कंम्पुटर द्वारे हेल्थ चेकअप करण्यात आले.
यावेळी श्री समर्थ कृपा सखी स्वयं सहाय्यता संस्थेचे संस्थापक-संगीता सचिन ढेरे, सुप्रिया सरफरे, पूजा प्रसादे,अनघा ठाकूर, विशाखा म्हात्रे, वैशाली पाटील, मीना रावल, मंजू कुमार,शिवराज युवा प्रतिष्ठानचे संस्थापक -संदेश ठाकूर,सचिन ढेरे, योगेश म्हात्रे,दिपक प्रसादे, धनंजय भोरे,राजेश सरफरे, सचिन भोईर,उमेश वैवडे, ओम निकेतन पाटील, सत्यवान भगत,मेडलाईफ फाउंडेशनचे संस्थापक भूषण शिरूडे,संचालक डॉ भुषण शाक्यवीर आदी मान्यवर उपस्थित होते. सदर आरोग्य शिबीर यशस्वी करण्यासाठी श्री समर्थ कृपा सखी स्वयं सहाय्यता संस्था व शिवराज युवा प्रतिष्ठानच्या पदाधिकारी सदस्यांनी विशेष मेहनत घेतली.चांगल्या उपक्रमाचे आयोजन केल्याने सर्व पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांनी आयोजकांचे आभार मानले. सदर आरोग्य शिबिराला पोलीस कर्मचाऱ्यांचा उत्तम प्रतिसाद लाभला.








Be First to Comment